ShahRukh Khan's Movie Jawan
ShahRukh Khan's Movie JawanDainik Gomantak

Shahrukh's Jawan Release Date : शाहरुखचा जवान आता या दिवशी होणार रिलीज...ड्रीम गर्लला फटका बसणार?

अभिनेता शाहरुख खानचा जवान हा चित्रपट या दिवशी रिलीज होणार आहे.
Published on

पठाणच्या जबरदस्त यशानंतर शाहरुख खानचा जवान आता त्याच्या चाहत्यांना खुश करण्यासाठी तयार आहे. साऊथचा सुपरहिट दिग्दर्शक अ‍ॅटलीच्या दिग्दर्शनाच्या या चित्रपटाचे काम अजुनही सुरू आहे.

 विजय सेतुपती, नयनतारा आणि सान्या मल्होत्रा ​​स्टारर हा चित्रपट, सुरुवातीला 2 जून रोजी पडद्यावर येणार होता,पण आता 25 ऑगस्टपर्यंत ढकलण्यात आला आहे. काहींच्या मते चित्रपटाच्या मोठ्या VFX कामामुळे विलंब झाला आहे.  

“पठाणप्रमाणेच जवानही वीकेंड वाढवण्याची मागणी करत होते. वीकेंडनंतर 29 ऑगस्टला ओणम आणि दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन असल्याने चित्रपटाला आणखी दोन सुट्ट्यांचा फायदा होणार आहे. निर्मात्यांना आशा आहे की ओणम वीकेंड विजय, नयनतारा आणि ऍटली यांच्या चाहत्यांना आकर्षित करेल.”

जर शाहरुख स्टारर जवानने 25 ऑगस्टची विंडो बुक केली, तर त्याचा परिणाम आयुष्मान खुरानाच्या ड्रीम गर्ल 2 च्या रिलीज प्लॅनवर होऊ शकतो , कारण ड्रीम गर्लही त्याच दिवसासाठी तयार होता. सूत्रांच्या माहितीनुसार “जवानसोबत कोणताही चित्रपट टक्कर होण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत, ड्रीम गर्ल 2 आणि त्यानंतरचे चित्रपट कदाचित त्यांच्या रिलीज डेट सप्टेंबरच्या मध्यापर्यंत पुढे ढकलतील.”

ShahRukh Khan's Movie Jawan
Kartik Aryan : कॅन्सरने आमचं कुटूंब उद्ध्वस्त झालं असतं पण माझ्या आईने...कार्तिक आर्यनने केली भावनिक पोस्ट..

शाहरुखचा जवान जर 25 ऑगस्टला रिलीज झाला तर याच दिवशी रिलीज होणाऱ्या ड्रीम गर्लवर याचा परिणाम होण्याची शक्यता साहजिकच निर्माण झाली आहे. शाहरुखच्या जवानने मिळवलेल्या मोठ्या यशानंतर आता पुन्हा एकदा तो जवान चित्रपटातून त्याच्या चाहत्यांना भेटायला येणार आहे. आता जवानची तारीख बदलणार की ड्रीम गर्ल पुन्हा एकदा आपली रिलीज डेट बदलणार हे पाहुया.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com