बॉलिवूडचे असे कित्येक स्टार आहेत ज्यांनी कॅन्सरवर मात केली आहे. आपली इच्छाशक्ती आणि योग्य उपचारांनी या आजारावर मात करता येते हेच या स्टार्सनी दाखवलं आहे. सध्या कार्तिक आर्यनच्या एका पोस्टची सोशल मिडीयावर चर्चा सुरू आहे .
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनची आई माला आता कॅन्सरपासून मुक्त झाल्या आहे. कार्तिक आर्यनने आपल्या आईसाठी एक हृदयस्पर्शी नोट शेअर केली आहे, जिने या भयंकर आजारावर मात केली आहे आणि आयुष्याच्या सुंदर प्रवासात पुढे जात आहे.
कार्तिक आर्यनने इंस्टाग्रामवर आपल्या पोस्टमध्ये त्याच्या आईच्या धैर्याची प्रशंसा केली आहे आणि त्या कठीण क्षणांबद्दल देखील सांगितले आहे ज्याने त्याच्या कुटुंबाला प्रेम आणि एकमेकांना आधार देण्याबद्दल शिकवले आहे.
कार्तिक आर्यनने लिहिले आहे की, 'काही काळापूर्वी या महिन्यात कॅन्सरसारखा आजार गुप्तपणे आमच्या घरात आला आणि आमच्या कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला.'
त्यांनी या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, 'आम्ही हताश आणि निराश तसेच असहाय होतो. पण माझ्या आईची इच्छाशक्ती आणि कधीही हार न मानण्याची सवय यामुळे आम्ही मोठ्या हिमतीने पुढे गेलो आणि अंधारात विजय मिळवला आणि ही लढाई आम्हाला जिंकायची होती.
शेवटी याने आम्हाला काय शिकवले आहे आणि आम्ही दररोज जे शिकत आहोत ते म्हणजे तुमच्या कुटुंबात प्रेम आणि पाठिंब्यापेक्षा चांगले काहीही नाही.'#SuperHero #CancerWarrior
याआधीही कार्तिक आर्यनने त्याच्या आईसोबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्या व्हिडिओमध्ये कार्तिक आपल्या आईच्या कॅन्सरबद्दल बोलताना दिसत होता. कार्तिकची आई ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत होती. व्हिडिओमध्ये आपल्या आईबद्दल बोलताना कार्तिक खूप भावूक झाला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.