Jawan new Poster : कधी भयंकर, कधी रोमँटिक तर कधी... एक चित्रपट एक किंग खान ;पण चेहरे मात्र अनेक..जवानचं पोस्टर बघुन घ्याच

Shahrukh Khan Shares new Poster Video of Jawan: बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानचा आगामी चित्रपट जवान सध्या चर्चेत आहे, नुकतंच या चित्रपटाचं नवं पोस्टर स्वत: शाहरुख खानने शेअर केलं आहे.
Shah rukh Khan's new Look
Shah rukh Khan's new LookDainik Gomantak

Shahrukh Khan Shares new Poster Video of Jawan: अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी जवान चित्रपटामुळे मनोरंजन विश्वाच्या चर्चेतल्या केंद्रस्थानी आहे.

नुकतंच शाहरुखने त्याच्या चित्रपटाचं नवीन पोस्टर सोशल मिडीयावर शेअर केलं आहे.

जवानचा नवीन लूक

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि जवान मधील त्याच्या लूकने प्रिव्ह्यू लाँच झाल्यापासून प्रेक्षकांना आकर्षित केले आहे.

प्रिव्ह्यूने प्रेक्षकांना अॅक्शनची एक भन्नाट झलक आधीच दाखवली आहे, जवानाच्या सर्वात चर्चेत असलेल्या गोष्टींपैक एक म्हणजे SRK चे विविध लूक.

या वेगवेगळ्या लूक्समुळे चित्रपटाची कथा काय असेल? प्रत्येक पात्रामागची गोष्ट काय असेल? याबद्दलही उत्सुकता निर्माण झाली आहे.

पाच वेगवेगळे लूक्स

जवान पासून SRK चे सर्व लूक्स एकाच फ्रेममध्ये एकत्र आणून, नवीन पोस्टर आज रिलीज करण्यात आले आहे आणि चित्रपटातील पाचही वेगवेगळे लूक्स पाहुन प्रेक्षकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. 

या वेगवेगळ्या लूक्समध्ये SRK ज्या सहजतेने वावरताना दिसतोय. हा शाहरुखच्या अष्टपैलू अभिनेता असण्याचा पुरावा आहे.

जवान निःसंशयपणे प्रेक्षकांना SRK च्या वेगळ्या वर्जनसह रिलीज होण्यासाठी तयार आहे.

Shah rukh Khan's new Look
Movie on Chandrayaan 3 : मिशन मंगलचा दिग्दर्शक आता चांद्रयानावर बनवणार चित्रपट... जाणुन घ्या कलाकार आणि स्क्रिप्टविषयी

शाहरुखच्या पोस्टरची कॅप्शनची सुरूवात

पोस्टर शेअर करताना शाहरुख खानने लिहिले, “ये तो शुरूआत है... इन्साफ के अनेक चेहरे... ये तीर हैं... अभी ढाल बाकी है... ये अंत है अभी काल बाकी है. ये पूछता है खुद से कुछ.... अभी जवाब बाकी है. !!!” त्याच्या कॅप्शनने चाहत्यांना खरोखरच उत्सुकता दिली. ते खाली पहा!

Shah rukh Khan's new Look
Sujit Sircar :"चित्रपटाला मिळालेले पाचही राष्ट्रीय पुरस्कार मी इरफान खानला समर्पित करतो" हा दिग्दर्शक झाला भावुक...

जवानची निर्मिती आणि स्टारकास्ट

जवान हे अॅटली दिग्दर्शित रेड चिलीज एंटरटेनमेंटची निर्मिती आहे. हा चित्रपट गौरी खान निर्मित आणि गौरव वर्मा सह-निर्मित आहे.

हा चित्रपट 7 सप्टेंबर 2023 रोजी जगभरातील थिएटरमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होईल. 

या चित्रपटात शाहरुख खान आणि नयनतारा मुख्य भूमिकेत आहेत. विजय सेतुपती, प्रियामणी, सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोव्हर, योगी बाबू आणि रिद्धी डोगरा देखील या चित्रपटाचा एक भाग आहेत. 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com