Jawan Impact on Gadar 2 : बॉलीवूडचा बादशाह हे शाहरुख खानला लावलेलं बिरुद जवान रिलीज होताच सार्थ ठरलं आहे. जवानने 7 सप्टेंबरला रिलीजच्या पहिल्याच दिवशी जवानने 75 कोटींची उच्चांकी कमाई केली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी ओपनिंग आहे.
यापूर्वी इतकी मोठी कमाई कोणत्याही चित्रपटाने केली नव्हती. जवान रिलीज झाल्यामुळे आता त्याचा परिणाम सध्या बॉक्स ऑफिसवर चालत असलेल्या चित्रपटांवर होत आहे.
जवानचा थेट परिणाम सनी देओलच्या गदर 2 आणि आयुष्यमान खुरानाच्या ड्रीम गर्ल या चित्रपटावर होताना दिसत आहे.
'गदर 2' मधील सनी देओलने ऑगस्टमध्ये बॉक्स ऑफिसवर 'दे दना दन'चा पाऊस पाडला. आता 28व्या दिवसापर्यंत बॉक्स ऑफिसवर 'तारा सिंह'चा श्वासही फुलू लागला आहे.
'जवान'च्या एंट्रीने तारा सिंह आणि सकीनाची अडचण वाढली आहे. 2023 च्या जन्माष्टमीच्या मुहूर्तावर शाहरुख खानचा 'जवान' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
पहिल्या दिवशी मिळालेला प्रतिसाद पाहता जवानची कमाई जोमाने होणार हे आधीच स्पष्ट झालं होतं. चित्रपटाने पहिल्या दिवशी 75 कोटींची कमाई केली आहे.
अशा परिस्थितीत अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर 2' या चित्रपटाला मोठा फटका बसला आहे. सगळ्या आव्हानांना न जुमानता 'गदर 2' ने गुरुवारी म्हणजेच 28 व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमवला ते सांगूया.
जवान बनाम गदर 2: अॅटली दिग्दर्शित जवान रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर अडकलेल्या 'ड्रीम गर्ल 2', 'ओएमजी 2' आणि 'गदर 2' च्या कमाईवर लक्षणीय परिणाम झाला आहे.
शाहरुख खान-नयनतारा यांच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला असून पहिल्याच दिवशी 75 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे.
sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'गदर 2' ने बुधवारी 2.90 कोटींचा व्यवसाय केला. गुरुवारी जवानच्या रिलीजने गदरला मोठाच धक्का बसला आणि कमाई थेट निम्म्याहून कमी झाली.
सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, 'गदर 2' ने 7 सप्टेंबर 2023 रोजी जन्माष्टमीच्या मुहूर्तावर 1.50 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. यासह गदर 2 ने या 28 दिवसांत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकूण 510.59 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.
'जवानने बॉक्स ऑफिसवर ज्या प्रकारे पहिल्या दिवशी कमाई केले ते पाहता त्याचा फटका गदरला सहन करावा लागणार होताच. असे असतानाही 'गदर 2'ने दीड कोटींचा व्यवसाय करून निर्मात्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. .
पहिल्या आठवड्यात 3500-3700 स्क्रीनवर प्रदर्शित झालेला गदर आता चौथ्या आठवड्यात 21000 पेक्षा कमी स्क्रीनवर आला आहे.
मात्र, 2 तास 50 मिनिटांच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टरचा किताब पटकावला आहे. असं असलं तरीही गदरचा जोर ओसरला आहे.
सनी देओलच्या 'गदर 2' ने अनेक विक्रम मोडले असले तरी यावर्षी जानेवारीत रिलीज झालेल्या शाहरुख खानच्या 'पठाण'लाही तो मागे टाकू शकला नाही.
पठाणचा ओपनइंड किंवा एकूण कलेक्शनचा विक्रमही तोडू शकला नाही. होय, 'पठाण'ने पहिल्या दिवशी भारतात 57 कोटींचा व्यवसाय केला तर 'गदर 2'ने कोटींची कमाई केली आहे.
जर सनी देओलला शाहरुख खानचा विक्रम मोडायचा असेल तर त्याला देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 543 कोटींचा आकडा पार करावा लागेल.
पठानचा जगभरातल्या कमाईचा आकडा 1055 कोटींहून अधिक आहे. हे आकडे पाहिल्यानंतर गदर 2 हा विक्रम मोडणे कठीण आहे असे वाटते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.