एकता कपूर हे नाव इंडस्ट्रीला आणि मनोरंजन विश्वाची प्राथमिक माहिती असणाऱ्या व्यक्तीलाही नवीन नाही. जे हिंदी मालिकांचे चाहते आहेत त्यांच्यासाठी त्यांना एकता कपूर कोण हे सांगण्याची गरज नाही.
हिंदी मालिकांची निर्माती आणि दिग्दर्शिका म्हणून एकता कपूरने आजवर इंडस्ट्रीत नाव कमावले आहे. सध्या एकता तिच्या आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत आहे.
थँक्स फॉर कमिंग या आगामी चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
भारतीय समाजात एकेकाळी एखाद्या कलाकृतीद्वारे सेक्सबद्दल बोलणं हे गैर मानलं जायचंं. कुणी असा प्रयत्न जरी केला तरी त्याला संस्कृतीद्रोही ठरवलं जायचं.
नातेसंबंधांवरही भाष्य करताना रोमॅन्टिक सीन्सना एका विशिष्ठ मर्यादेत शूट केलं जायचं ;पण आज काळ बदलला आहे. आणि बदलत्या काळासोबत आजचा सिनेमाही बदलला आहे.
अलीकडेच अभिनेता पंकज त्रिपाठीच्या 'OMG 2' या चित्रपटात लैंगिक शिक्षणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. एकता कपूरच्या आगामी थँक्स फॉर कमींग या
चित्रपटातही सेक्सवर भाष्य केले आहे.
एकता कपूर अविवाहित आहे, पण या गोष्टीचा तिच्या कामाशी काहीच संबंध नाही, साहजिकच एकताला एकता कपूरचा लग्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे.
ती म्हणते, 'मला अनेकदा विचारले जायचे, मॅडम, तुम्ही कधी सेटल होत आहात? हे ऐकून माझी चिडचिड व्हायची.
आता मी लोकांना कसे समजावू की मी पूर्णपणे सेटल झाले आहे, मला आता किती सेटल करायचे आहे. रागाच्या भरात खुर्चीवर बसून मी आता दाखवते, की मी पूर्णपणे सेटल झाले आहे, मला आता सेटल व्हायचे नाही.
एकता कपूर म्हणते, 'कोणतीही महिला लग्नानंतर सेटल होते, हे लोकांच्या मनात घर करून आहे. मला हे ऐकून आश्चर्य वाटते की सेटल होण्यासाठी लग्न करण्याची गरज का आहे?
लग्नाशिवाय स्त्री आयुष्य जगू शकत नाही का? प्रत्येकाचा जीवन जगण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. आयुष्यात सेटल होण्यासाठी लग्नच करावं लागत नाही.
लग्न करून सेटल होण्याचा हा विचित्र प्रश्न केवळ महिलाच नाही तर पुरुषांनाही विचारला जातो . एकता कपूर म्हणते, 'लग्न झाल्यानंतर सेटल होण्याबद्दल केवळ महिलांसोबतच नाही तर पुरुषांसोबतही चर्चा केली जाते.
सलमान भाईलाही अनेकदा हाच प्रश्न विचारला जातो की लग्न झाल्यावर तो कधी सेटल होतोय. हे ऐकून खूप विचित्र वाटतं. लोकांच्या या विचारसरणीचे मला खूप आश्चर्य वाटते.
'थँक यू फॉर कमिंग' या चित्रपटाची निर्मिती अनिल कपूरची मुलगी रिया कपूर आणि एकता कपूरने केली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे.
चित्रपटातील कनिका कपूरची भूमिका साकारणारी भूमी पेडणेकर तिच्या पसंतीच्या मुलाशी लग्न करते, पण तिला अपेक्षित आनंद मिळत नाही, असे चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. ती तिच्या समस्या तिच्या कुटुंबीयांशी आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करते.