Aryan Khan : 'आर्यन खान'च्या दिग्दर्शनाखाली 'बॉबी देओल' दिसणार नव्या भूमीकेत

शाहरुखच्या जवानचा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ सुरू असताना आता आर्यन खानच्या नव्या सिरीजची जोरदार चर्चा सुरू आहे.
Aryan Khan
Aryan KhanDainik Gomantak

Aryan Khan upcoming Web Series : अभिनेता शाहरुख खानच्या जवानने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालत असताना आता शाहरुखचा मुलगा आणि वादग्रस्त ड्रग्ज प्रकरणामुळे देशभरात चर्चेचा विषय बनलेला आर्यन खान आता त्याच्या आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आर्यन खान गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या त्याच्या स्क्रिप्टनंतर आता थेट प्रोजेक्टला सुरूवात करणार आहे.

बॉबी देओल मुख्य भूमीकेत

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान त्याच्या डेब्यू वेब सीरिजमधून बॉलीवूडमध्ये नशीब आजमावणार आहे. आर्यन खानच्या या आगामी सिरीजमध्ये बॉबी देओल मुख्य भूमीकेत असणार आहे. 

आपल्या या आगामी प्रोजेक्टची घोषणा आर्यनने 2022 सालीच केली होती. एक फोटो शेअर करत त्याने आगामी दिग्दर्शनाच्या भूमीकेचे संकेत दिले होते. आर्यनने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये त्याची रेड चिलीज एंटरटेनमेंट स्क्रिप्ट होती. 

स्क्रिप्ट पूर्ण

2022 मध्येच स्क्रिप्टचे काम पूर्ण झाल्याची माहिती आर्यनने दिली होती. फोटो शेअर करताना त्यांनी लिखाणाचे काम पूर्ण झाल्याचे सांगितले. 

या सिरीजमधून तो इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या मालिकेचे नाव 'स्टारडम' आहे. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

बॉबीने काही भाग शूट केले

'बॉबी देओलने यापूर्वीही रेड चिलीजसोबत काम केले आहे आणि आर्यन त्याच्यासोबत काम करण्यास उत्सुक होता. या मालिकेत बॉबी देओल एका वेगळ्या अवतारात दिसणार आहे. 

बॉबीने या मालिकेतील काही भाग शूट केले आहेत आणि उर्वरित भाग पूर्ण करणार आहे. आर्यनने या मालिकेत काही नवीन कलाकारांना देखील सामील केले आहे आणि ते त्यांच्या पदार्पणाबद्दल खूप उत्सुक आहेत.

Aryan Khan
'जवान' अक्षरश: सुसाट, 500 कोटींची इतकी वेगवान कमाई आजवर झाली नाही...

सीरिजचे 6 भाग

मिळालेल्या माहितीनुसार आर्यनच्या वेब सीरिजच्या लेखनाचे काम पूर्ण झाल्यानंतर आता शूटिंगला सुरुवात झाली आहे. 

रिपोर्ट्सनुसार, या सीरिजचे सहा भाग असतील. आर्यनने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर चित्रपटाशी संबंधित माहितीही शेअर केली आहे.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com