'जवान' अक्षरश: सुसाट, 500 कोटींची इतकी वेगवान कमाई आजवर झाली नाही...

SRK's Jawan: शाहरुख खानच्या जवानचा सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार धुडगूस सुरू आहे, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेल्या बाकी सगळ्या चित्रपटांना पछाडलं आहे.
Jawan Day 4 Box office Collection
Jawan Day 4 Box office CollectionDainik Gomantak
Published on
Updated on

SRK's Jawan: 7 सप्टेंबरला शाहरुख खानचा जवान जगभरात रिलीज झाला. शाहरुख खान या नावाची क्रेज पहिल्याच दिवशी त्याच्या चाहत्यांनी सर्वांना दाखवली.

रिलीजच्या दिवशी पहाटेचे शो गर्दीने खचाखच फुलून गेले होते. थिएटर्समध्ये चाहत्यांनी शाहरुखच्या नावाचा जयघोष केला होता. साहजिकच चित्रपटाने कमाईचा नवा रेकॉर्ड केला आहे.

जवानचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

साऊथचा सुपरस्टार अॅटली कुमार दिग्दर्शित जवान , रिलीज झाल्यानंतर पाच दिवसांनी देशांतर्गत बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये ₹ 300 कोटींची कमाई करुन जवानने सगळ्यांनाच भुवया उंचावायला भाग पाडलं होतं . 

Sacnilk.com नुसार ,जवान हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट यावर्षी भारतात ₹ 300 कोटींचा गल्ला पार करणारा तिसरा हिंदी चित्रपट ठरला आहे. 

पहिल्या दिवसाची कमाई

Sacnilk.com नुसार, जवानने पाचव्या दिवशी भारतात सर्व भाषांसाठी ₹ 30 कोटी नेट कमावले , जवानाने पहिल्या दिवशी ₹ 75 कोटी (हिंदी: ₹ 65.5 कोटी, तमिळ: ₹ 5.5 कोटी आणि तेलुगू: ₹ 4 कोटी) कमावले

बॉक्स ऑफिस कलेक्शन

दुसऱ्या दिवशी 53.23 कोटी (हिंदी:  46.23 कोटी, तमिळ: 3.87 कोटी, तेलगू:  3.13 कोटी); तिसर्‍या दिवशी  77.83 कोटी (हिंदी: 68.72 कोटी, तमिळ:  5.34 कोटी, तेलुगु:  3.77 कोटी) आणि  80.1 कोटी (हिंदी: 71.63 कोटी; तमिळ:  5 कोटी; तेलुगु:  3.47 कोटी) चौथ्या दिवशी. आतापर्यंत भारतातील चित्रपटाचे एकूण कलेक्शन  316.16 कोटी आहे.

फक्त 4 दिवसांत 500 कोटी

जवान हा जागतिक बॉक्स ऑफिसवर ₹ 500 कोटींचा टप्पा ओलांडणारा सर्वात जलद हिंदी चित्रपट ठरला आहे . हा टप्पा गाठण्यासाठी चित्रपटाला अवघे चार दिवस लागले. 

रेड चिलीज एंटरटेनमेंट या चित्रपटामागील निर्मिती कंपनीने सोमवारी इंस्टाग्रामवर बातमी शेअर करून ही उल्लेखनीय कामगिरी साजरी केली. 

जवानने पहिल्या वीकेंडमध्ये जगभरातील बॉक्स ऑफिसवर ₹ 520.79 कोटी कमाई केली.

शाहरुखचं ट्वीट

जवान पाहिल्यानंतर चाहत्यांनी दाखवलेल्या प्रेमावर प्रतिक्रिया देताना शाहरुख खानने X वर एक नोट शेअर केली. त्याने लिहिले, "#Jawan साठी सर्व प्रेम आणि कौतुक केल्याबद्दल धन्यवाद!! सुरक्षित आणि आनंदी रहा…

शाहरुख पुढे लिहितो "कृपया चित्रपटांचा आनंद घेत असलेल्या सर्वांचे फोटो आणि व्हिडिओ पाठवत राहा.... आणि ते सर्व पाहण्यासाठी मी लवकरच परत येईन. तोपर्यंत... थिएटरमध्ये जवानांसोबत पार्टी करा!! खूप प्रेम आणि कृतज्ञता!"

Jawan Day 4 Box office Collection
Asia Cup 2023: सासरेबुवांनी केलं जावयाचं कौतुक, सुनिल शेट्टीची केएल राहुलला शाबासकीची थाप, अनुष्काही विराटवर खुश

जवानचे कलाकार

या चित्रपटात शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यात दीपिका पदुकोण आणि संजय दत्त यांच्याही विशेष भूमिका आहेत. 

जवानमध्ये सान्या मल्होत्रा, प्रियामणी, गिरिजा ओक, संजीता भट्टाचार्य, लहर खान, आलिया कुरेशी, रिद्धी डोग्रा आणि सुनील ग्रोव्हर यांच्याही महत्त्वाच्य भूमिका आहेत.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com