Sameer Wankhede Controversy: समीर वानखेडे यांच्या अडचणीत भर; मॉडेलने केला गंभीर आरोप

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाच्या कारवाईमुळे चर्चेत असणारे NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Sameer Wankhede Controversy
Sameer Wankhede ControversyDainIk Gomantak

Sameer Wankhede Controversy: अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला क्रूझवर ड्रग्ज बाळगल्याचा आरोप ठेवत अटक करणारे NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ केली आहे.

मॉडेल मुनमुन धमेचा हिने आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणात २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा ठपका ठेवत समीर वानखेडे यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. अशातच आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

त्या पार्टीत मुनमुनलाही अटक

दोन वर्षापूर्वी क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणामध्ये एनसीबीने ३ ऑक्टोंबरला मॉडेल मुनमुन धमेचा हिला अटक केली होती. यावेळी ती चांगलीच चर्चेत आली होती. दरम्यान आता ती पुन्हा चर्चेत आली आहे. वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

ही केस त्याकाळात देशभरात चर्चेचा विषय झाली होती, आपल्या लाडक्या लेकाचा वाचवण्यासाठी शाहरुख खानने वकिलांची फौजच उभी केली होती. काही काळाने आर्यन खानची या प्रकरणातून सुटका झाली ;पण त्याला अटक करणारे समीर वानखेडे मात्र या प्रकरणात चांगलेच अडकले आहेत.

मुनमुनचा वानखेडेंवर गंभीर आरोप

मिड-डे ला दिलेल्या माहितीनुसार, मुनमुन धमे भीतीपोटी गप्प बसली होती. पण आता सीबीआयने वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने सत्य बाहेर येईल. अशी अपेक्षा आहे.

प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्धीसाठी केवळ मीडिया प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्याने माझ्यासारख्या अनेकांना खोट्या प्रकरणात गोवले आहे.

त्यांना माहीत आहे की, मीडिया त्यांच्या कारवाईला कव्हरेज देईल. म्हणून वानखेडे सातत्याने मॉडेल्स आणि सेलिब्रेटींना टार्गेट करत होते.

Sameer Wankhede Controversy
Sameer Wankhede ControversyDainik Gomantak

मुनमुन आणि आर्यनला जामीन मंजूर

ऑक्टोबर 2021 च्या पहिल्या आठवड्यात, एनसीबीने मुनमुन धमेचासह आर्यन खान आणि इतरांना अंमली पदार्थ बाळगणे, सेवन आणि तस्करीच्या आरोपाखाली अटक केली होती. मुनमुन धमे आणि आर्यन खान यांना 28 ऑक्टोबर 2021 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.

पुराव्याअभावी मे २०२२ मध्ये एनसीबीने दाखल केलेल्या आरोपपत्रात आर्यन खान आणि इतर पाच जणांची नावे नसली तरी एनसीबीने दाखल केलेल्या आरोपपत्रात मॉडेल धमेचाचे नाव आरोपी म्हणून ठेवण्यात आले होते.

Munmun Dhamecha
Munmun DhamechaDainik Gomantak

मुनमुन धमेचा आहे तरी कोण?

मध्य प्रदेशची असणारी मुनमुन धमेचा एका उद्योगपती परिवारामधून आहे. मुनमुन धमेचा एक मॉडेल असून ती सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. मुनमुन धमेचाच्या आईचे निधन झाले होते. तीचा भाऊ प्रिंन्स भमेचा सध्या दिल्लीमध्ये राहतो.

मुनमुन धमेचाने तिचे शालेय जीवन मध्य प्रदेशातील सागर येथे पूर्ण केले. त्यानंतर काही काळ ती तिच्या भावासोबत दिल्लीमध्ये राहत होती.

Sameer Wankhede Controversy
The Kerala Story Day 5 Box-office Collection: 'द केरळ स्टोरी' नं बॉक्स ऑफिसवर पाचव्या दिवशी घेतली भरारी! कमावला इतक्या कोटींचा गल्ला...

मुनमुन धमेचा अनेक कलाकारांसोबत पार्टी करताना दिसून येत आहे. या संबधीचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे. मुनमुन धमेचाने वरुण धवन, अर्जुन रामपाल, वीजे निखिल, गुरु रंधावा , सुयश राय यांसारख्या कलाकारांसोबत फोटो शेअर केले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com