"30 तारखेला लग्न आणि नवरा पळाला, आता माझ्याशी लग्न कोण करणार?" चहलसोबत नात्याच्या चर्चांवर महवशची Post Viral

RJ Mahvash viral post: कथित प्रेमसंबंधांच्या चर्चांदरम्यान लग्नाचेही दावे केले जात आहेत, ज्यावर आता महवशने स्वतः आपली भूमिका स्पष्ट केली आहे
rj mahvash husband
rj mahvash husbandDainik Gomantak
Published on
Updated on

RJ Mahvash Chahal Relationship: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, आरजे आणि मॉडेल महवश हिचे नाव सध्या भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल सोबत जोडले जात आहे. दोघांनाही अनेकदा एकत्र पाहिले गेले असून, अलीकडेच लंडनमध्ये ते एकत्र फिरताना दिसले. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधूनही या जवळिकीचे संकेत मिळत आहेत. त्यांच्या कथित प्रेमसंबंधांच्या चर्चांदरम्यान लग्नाचेही दावे केले जात आहेत, ज्यावर आता महवशने स्वतः आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

नवरदेव पळून गेला' म्हणत महवशची खुमासदार पोस्ट

या फोटोंमध्ये महवश पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये एखाद्या राजकुमारीसारखी दिसत आहे. या फोटोंसोबत तिने एक मजेशीर कॅप्शन लिहिले आहे, "काही न्यूज चॅनेलने दावा केला की ३१ जूनला माझे लग्न आहे. हे फोटो त्याच लग्नाचे आहेत. फक्त नवरदेव पळून गेला. कोण करेल माझ्याशी लग्न?" यासोबत तिने हसणारे इमोजीही वापरले आहेत, ज्यामुळे तिच्या बोलण्यातील विनोद दिसून येतो.

चाहत्यांच्या प्रश्नांवर महवशचे थेट उत्तर

महवशच्या सोशल मीडिया पोस्टवर युझर्सकडून अनेक मजेशीर कमेंट्स येत आहेत. चाहते आणि सेलिब्रिटीही यावर प्रतिक्रिया देत आहेत. एका युझरने महवशला "लव्ह मॅरेज करणार की अरेंज मॅरेज?" असा थेट प्रश्न विचारला. यावर महवशने उत्तर दिले, "लव्ह मॅरेज! कारण ओळखलेला नालायक अनोळखी नालायकापेक्षा चांगला असतो."

rj mahvash husband
"युझी खेळत राहिला, ही बनली क्रिकेट टीमची मालकीण" Rj Mahvash मुळे चाहते क्लीन-बोल्ड

तिच्या या उत्तराने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तिच्या या बिनधास्त उत्तराची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. इतरही काही युझर्सनी "जगातील सर्वोत्तम फोटोग्राफर युझी भाई" अशी कमेंट करत अप्रत्यक्षपणे चहलकडे लक्ष वेधले.

चहलच्या घटस्फोटानंतर चर्चेला सुरुवात

युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटानंतर चहलचे नाव महवशसोबत जोडले जात आहे. या दोघांनीही आपल्या डेटिंगच्या कथित बातम्यांवर अजूनपर्यंत थेट कोणतेही भाष्य केलेले नाही. मात्र, त्यांच्या सोशल मीडियावरील अप्रत्यक्ष पोस्टमधून त्यांच्यातील वाढत्या जवळिकीचे संकेत मिळतच आहेत. या नात्याला अधिकृत दुजोरा कधी मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com