Akshata Chhatre
भारताने किवीना हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी घरी आणल्यानंतर सगळीकडेच याची चर्चा सुरु आहे, मात्र ही चर्चा इंडियन टीमबद्दल नसून एका मुलीबद्दल सुद्धा आहे.
भारताचा धुरंदर गोलंदाज युझी चहल सोबत याच अंतिम सामन्याच्यावेळी एक मुलगी दिसली होती. पत्नी धनश्री सोबत घटस्फोटाच्या चर्चनंतर आता लगेचच चहल भल्याच मुलीसोबत दिसल्याने सगळीकडेच चर्चा सुरु झालीये.
पण ही मुलगी आहे तरी कोण? आणि ती चहलसोबत का? असा प्रश्न फॅन्सना सतावतोय. चला मग जाणून घेऊया युझीसोबत असलेली ती मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण?
ती आहे आरजे मैहवश. व्यवसायाने रेडिओ जॉकी आहे आणि सोबतच ती इंस्टाग्रामवर कॉन्टेन्ट क्रियेट करते. काही दिवसांपूर्वी तिने एक व्हिडीओ तयार केला होता ज्यात ती मेट्रोमध्ये एका अपरिचित मुलाला फुल देत होती.
धनश्री वर्मा आणि चहल यांच्यात वादाची ठिणगी पडल्याच्या बातम्या उठू लागल्या, यानंतर धनश्री आणि चहल यांनी एकमेकांना अनफॉलो केलं मात्र त्याच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झाला नव्हता.
यानंतर मात्र युझी या भल्याच मुलीसोबत दिसायला लागताच धनश्री आणि त्याच्यात गोष्टी अलबेल नसल्याचे तर्क नेटकऱ्यांनी लावले. आधी एका हॉटेलमध्ये आणि त्यानंतर आता दोघे सोबत दिसले आहेत.
काही लोकं युझीमुळेच धनश्रीसोबत त्याचं नातं तुटलं असं म्हणतायत तर काही लोकांनी धनश्रीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय.