"युझी खेळत राहिला, ही बनली क्रिकेट टीमची मालकीण" Rj Mahvash मुळे चाहते क्लीन-बोल्ड

RJ Mahvash Cricket Team: तिने एका T10 क्रिकेट टीममध्ये हिस्सेदारी विकत घेतली आहे ज्यामुळे सोशल मीडियावर तिच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे
 RJ Mahvash co-owner
RJ Mahvash co-ownerDainik Gomantak
Published on
Updated on

RJ Mahvash Sports Investment: भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलच्या घटस्फोटानंतर सतत ज्यांचे नाव जिच्यासोबत जोडलं जातंय ती प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर आरजे महवश सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असलेल्या महवशने आता थेट एका क्रिकेट टीमची सहमालकीण बनण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. हा निर्णय आयपीएल टीमबद्दल नसला तरी, तिने एका T10 क्रिकेट टीममध्ये हिस्सेदारी विकत घेतली आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर तिच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

आरजे महवशचा 'बोल्ड स्टेप' आणि क्रिकेट कनेक्शन

आरजे महवश तिच्या बेधडक बोलण्यासाठी ओळखली जाते आणि ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता तिने चॅम्पियन्स लीग T10 टूर्नामेंटमध्ये एका टीमची हिस्सेदारी विकत घेतल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. यापूर्वी महवशने असं व्यावसायिक पाऊल उचललं नव्हतं.

ती नेमक्या कोणत्या टीमची सहमालकीण झाली आहे, हे अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेले नाही, पण ही बातमी समोर आल्यापासून तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. आरजे महवशचं क्रिकेटशी जुनं नातं आहे. युजवेंद्र चहलसोबत तिचं नाव जोडलं जाण्यापूर्वीही ती क्रिकेट मैदानांवर अँकरिंग करताना दिसली आहे, त्यामुळे क्रिकेटबद्दलची तिची आवड सर्वश्रुत आहे.

 RJ Mahvash co-owner
RJ Mahvesh: मेट्रोतील 'फूलवाली'च चहलची 'मिस्ट्री गर्ल'?

सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस

या बातमीनंतर सोशल मीडियावर लोकांनी आरजे महवश आणि युजवेंद्र चहल यांच्याबद्दल विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलं "आता होईल कमबॅक!" तर दुसऱ्याने गंमतीने म्हटले आहे, "आकाश भाई, बघताय ना? पैसा असला की सगळं बदलू शकतं, अगदी बायकोही!" तर आणखी एकाने लिहिले, "भाई क्रिकेटच खेळत राहिला, ही तर मालकीणच बनली."

या सर्व चर्चांवर युजवेंद्र चहलने मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आरजे महवशने घेतलेल्या या नव्या पावलामुळे तिच्या चाहत्यांना आनंद झाला असून, ती आता क्रिकेटच्या मैदानात नव्या भूमिकेत दिसणार असल्याने तिच्याबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com