Rekha-Raveena Tandon: रेखा- रविनामध्ये अक्षय कुमारसोबतच्या नात्यामुळे वाद झाला होता? दोघी एकत्र दिसताच चाहत्यांनी विचारले प्रश्न

एक काळ होता जेव्हा अक्षय कुमारचे नाव अभिनेत्री रेखाशी जोडलं गेलं होतं. यावरून रविना आणि रेखा यांचे संबंध बिघडले अशाही गॉसिप्स त्या काळात गाजल्या
Rekha 
Raveena Tandon
Rekha Raveena TandonDainik Gomantak
Published on
Updated on

Rekha and Raveena spotted Together: रविना टंडन 90च्या दशकातली लाखो तरुणांच्या हृदयाची धडकन होती. मोहरा चित्रपटातल्या 'टीप टीप बरसा पानी' गाण्याने तर आजही तरुणाई वेडी होते. या चित्रपटानंतरच तीच्या अक्षयसोबतच्या नात्याची खूप चर्चा झाली होती. पण नंतर ही चर्चा अक्षय- रेखा यांच्या नात्याकडे वळाली. त्यामुळे रेखा- रवीना यांचे संबंध बिघडले अशीही चर्चा बरीच झाली.

आता दोघी एकत्र दिसताच या जुन्या गोष्टी चाहत्यांनी पुन्हा एकदा आठवल्या...त्याचं झालं असं बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन आणि रेखा एका कार्यक्रमात एकत्र दिसल्या. दोघीही एकमेकांना भेटताना आणि गप्पा मारताना दिसल्या. रवीनाने रेखासोबत सेल्फी काढला तर रेखाने रवीनाचे चुंबन घेतले.  हा व्हिडिओ आता व्हायरल होऊ लागला आहे.

शनिवारी रात्री एका कार्यक्रमात अनेक बॉलिवूड स्टार्स एकत्र आले. या कार्यक्रमात बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री रेखा आणि रवीना टंडन या दोघी आपल्या नेहमीच्या सुंदर अंदाजात पाहायला मिळाल्या आहेत. रेड कार्पेटवर दोघीही एकमेकींशी गप्पा मारताना, हसताना आणि गप्पा मारताना दिसल्या. जेव्हा रेखाने रवीना टंडनवर असं प्रेम व्यक्त केलं तेव्हा अभिनेत्रीने रेखासोबत सेल्फीही काढला.

 सध्या दोघांचा हा क्यूट व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे. याचे एक कारण म्हणजे रेखा बऱ्याच दिवसांनी कोणत्यातरी कार्यक्रमात दिसली. हा व्हिडीओ जरूर पाहा

रेखा एका सुंदर साडीत चाहत्यांना वेड लावुन गेली, तर रवीना टंडन काळ्या रंगाच्या पोशाखात दिसली. रेखाच्या केसांमधला गजरा आणि सुंदर दागिने तिच्या लुकमध्ये भर घालत होते. दोघींनीही पापाराझींशी संवाद साधला.

त्यानंतर रेड कार्पेटवर रेखा-रवीनाचे बोलणे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. रवीनाने अभिनेत्री रेखासोबत सेल्फीही काढला. या कार्यक्रमाला इशिता राज, श्रेया सरन, भूमी पेडणेकर, नर्गिस फाखरी, निमृत कौर यांच्यासह अनेक स्टार्स पोहोचले होते.

Rekha 
Raveena Tandon
Pathan's Director on Bikini Controversy : दिपीकाला का दाखवलं बिकीनीमध्ये? सांगतोय चित्रपटाचा दिग्दर्शक..

एक काळ असा होता जेव्हा या दोन्ही अभिनेत्रींचे नाव अक्षय कुमारसोबत जोडले जात होते. रेखा तिच्यापेक्षा 13 वर्षांनी लहान असलेल्या अक्षयसोबत फ्लर्ट करत असल्याचं म्हटलं जात होतं, या काळात अक्षयचं रवीनासोबतही नातं आहे. या दोन्ही अभिनेत्रींचे संबंध अक्षयमुळे बिघडल्याची चर्चा होती ;पण रवीना आणि रेखाने या गॉसिप्सवर कधीही प्रतिक्रिया दिली नाही.

आता जेव्हा दोन्ही अभिनेत्री एकत्र दिसल्या तेव्हा साहजिकच पापाराझी आणि चाहत्यांनी विचारायला सुरुवात केली की अक्षय कुमार कुठे आहे? त्याचवेळी काहींनी आणखी विचित्र कमेंट्स केल्या. आता दोघींनी जरी या गोष्टीवर स्पष्ट प्रतिक्रिया दिली नसली तरी हा विषय चाहते विसरणार नाहीत हे नक्की

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com