Konkani Ramayana: कुडतरीत वसिष्ठांनी 'बालरामासाठी' केलं होतं राक्षसाशी युद्ध; अशी आहे गोव्याच्या मातीत रुजलेली रामायणातील आख्यायिका

Ramayana in Goa: या कथेत २०-२२ वर्षांच्या बाल रामाचा उल्लेख आढळतो. ही कथा पोर्तुगीज येण्यापूर्वी मौखिक माध्यमातून प्रसिद्ध झाली असावी
Rare story of ramayana
Rare story of ramayanaDainik Gomantak
Published on
Updated on

Ramayana in Konkani: श्रीराम म्हणजे अनेकांचं दैवत आणि म्हणूनच रामायणाचं वेगवेगळ्या भाषेत झालेलं भाषांतर सुद्धा पाहायला मिळतं. प्रत्येकानं आपल्या भाषिकांना रामायण समजावं आणि उमजावं म्हणून ही भाषांतरं केली. पण तुम्हाला माहितीये का असंच एक रामायण कोकणी भाषेत देखील आहे. पोर्तुगालमधील ब्रागा येथील अभिलेखागारात जपलेल्या प्राचीन हस्तलिखितांच्या अभ्यासातून, कोकणी रामायणातील एक आश्चर्यकारक आणि अज्ञात कथा समोर आली, या कथेत २०-२२ वर्षांच्या बाल रामाचा उल्लेख आढळतो. ही कथा पोर्तुगीज येण्यापूर्वी मौखिक माध्यमातून प्रसिद्ध झाली असावी.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही कोकणी रामायणाची कथा गेल्या काही विस्कळीत पानांवर पाहायला मिळते. पुढे लॉर्डिनो रॉड्रिग्ज यांच्या अथक प्रयत्नांमुळे १९८० च्या दशकात ही अनोखी कथा उघड झाली. या कथेत श्रीराम मातेच्या मांडीवर खेळात असताना एक रक्षक हंस पक्षाचं रूप घेऊन तिथे प्रकट होतो. माता कौसल्या श्रीरामांसोबत नाही या संधीचा फायदा घेऊन हंस रूपातील राक्षस श्रीरामांना पळवून घेऊन जातो. लहान रामाच्या अपहरणाची वार्ता ऐकून राजा दशरथ आणि महाराणी कौसल्येवर दुःखाचा डोंगर कोसळतो. संतत्प राजा हातात धनुष्य घेऊन राक्षसाच्या मागावर जाणार एवढ्यात तिथे वसिष्ठ ऋषी प्रकट होतात आणि दांपत्याला आधार देत रामाला परत सुखरूप घेऊन येण्याचं आश्वासन देतात.

राक्षसाचा माग काढत ऋषी वसिष्ठ अयोध्या सोडतात, काही वेळानंतर एका बांधाच्या मागे लपलेल्या राक्षसाला शोधून काढण्यात ऋषी यशस्वी देखील होतात.

Rare story of ramayana
Ram Navami 2025: रामनवमीच्या प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा, येथे आहेत एकापेक्षा एक सुंदर मेसेज

दोघांमध्ये भलं मोठं युद्ध होतं कोकणी रामायणात युद्धाची ही जागा कुडतरी असल्याचा उल्लेख आढळतो. पुढे अयोध्येत परतत असताना वसिष्ठ आणि रामाला इंद्रजित पकडून घेऊन जातो आणि दोघांना खाऊन टाकण्याचा भय निर्माण करतो. मात्र ऋषी वसिष्ठ चतुराईने त्याला एक विहिरीकडे घेऊन जातात आणि डोकावून पाहायला सांगतात.

इंद्रजितला विहिरीत त्याच्याच आकाराचा राक्षस दिसतो. त्याला लढाईसाठी आव्हान देऊन तो विहिरीत उडी मारतो आणि वसिष्ठ त्याच्यावर चक्र फेकून त्याचा वध करतात, बालरामाची सुटका करून त्याला अयोध्येत सुखरूप घेऊन येतात. बालरामाच्या अपहरणाची ही कथा वाल्मिकी रामायणात आढळत नाही, मात्र यामध्ये गोव्यातील काही भागांचा उल्लेख नक्कीच आढळतो. ही कथा पोर्तुगीज येण्यापूर्वी मौखिक कथा म्हणून प्रसिद्ध असावी. पुढे पोर्तुगीज पाद्रींनी स्थानिक ब्राह्मणांकडून ऐकलेल्या कथा रोमन लिपीत उतरवल्या असल्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com