Raj Kundra: ''माझी एक किडणी घ्या'' राज कुंद्राने प्रेमानंद महाराजांना केली भलतीच विनंती; नेटकऱ्यांकडून झाली जोरदार टीका

Raj Kundra social media criticism: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हा प्रेमानंद जी महाराज यांना किडनी दान करण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे सध्या चर्चेत आहे
Raj Kundra Premanand Maharaj request
Raj Kundra Premanand Maharaj requestDainik Gomantak
Published on
Updated on

Raj Kundra kidney offer to Premanand Maharaj: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हा प्रेमानंद जी महाराज यांना किडनी दान करण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे सध्या चर्चेत आहे. वृंदावन येथे महाराज आणि राज कुंद्रा यांच्या भेटीचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजवर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली होती. अनेकांनी त्याला 'पब्लिसिटी स्टंट' म्हणत ट्रोल केले होते. यावर आता राज कुंद्राने ट्रोलर्सना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

नेमकं काय घडलं होतं?

१४ ऑगस्ट रोजी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा प्रेमानंद जी महाराजांच्या दर्शनासाठी वृंदावन येथील केली कुंज आश्रमात पोहोचले होते. यावेळी झालेल्या चर्चेत राज कुंद्रा यांनी महाराजांना सांगितले की, 'महाराज, माझी इच्छा आहे की तुम्ही माझी एक किडणी घ्यावी. तुम्हाला जो त्रास होत आहे, तो मला माहिती आहे. जर मी तुमच्या कामी येऊ शकलो, तर माझी एक किडणी तुमच्या नावे.' राज कुंद्रा यांचे हे बोलणे ऐकून शिल्पा शेट्टीही काही क्षणांसाठी थक्क झाली. मात्र, त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 'पब्लिसिटी स्टंट'च्या नावाखाली राज कुंद्रा यांना ट्रोल करण्यात आले.

Raj Kundra Premanand Maharaj request
Shilpa Shetty: शिल्पानं थेट मोदींनाच लिहलं पत्र! म्हणाली-'तुमच्यासारखे लोक...'

राज कुंद्रा यांचे ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

सोशल मीडियावर सुरू असलेल्या या टीकेला राज कुंद्रा यांनी आता ट्विटरवर (X अकाउंट) उत्तर दिले आहे. त्यांनी लिहिले की, "आपण एका विचित्र जगात जगतो. जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या शरीराचा एक भाग दान करण्याचा निर्णय घेते, तेव्हा तिची 'पीआर स्टंट' म्हणून खिल्ली उडवली जाते.

जर करुणा हा एक स्टंट असेल, तर जगाने असे स्टंट अधिक पाहावेत. जर माणुसकी ही एक रणनीती असेल, तर अधिकाधिक लोकांनी ती अवलंबली पाहिजे." राज कुंद्रा यांचे हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावरही अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com