Shilpa Shetty: शिल्पानं थेट मोदींनाच लिहलं पत्र! म्हणाली-'तुमच्यासारखे लोक...'

Shilpa Shetty: असेही भाजपने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Bollywood actress Shilpa shetty
Bollywood actress Shilpa shettySocial Media
Published on
Updated on

Shilpa Shetty: आयोध्येत २२ जानेवारी २०२४ ला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. राममंदीराचे उद्धाटन होण्याआधीपासून या सोहळ्याची मोठी चर्चा होती. या उत्सवाला अनेक कलाकारांनीदेखील उपस्थिती लावली होती. माधुरी दिक्षीत, आलिया भट्ट, जॅकी श्रॉफ , रणबीर कपूर यांच्यासह शिल्पा शेट्टीदेखील रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी आयोध्येत पोहचली होती.

आता बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीने राम मंदीर बांधल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. या पत्राचा फोटो, भारतीय जनता पार्टी (भाजप) महाराष्ट्राच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलने ट्विटरवर शेअर केला आहे.

शिल्पा या पत्रात म्हणते- 'आदरणीय मोदीजी, काही लोक इतिहास वाचतात. काही लोक इतिहासातून शिकतात. पण तुमच्यासारखे लोक इतिहास बदलतात. रामजन्मभूमीचा पाचशे वर्षांचा इतिहास तुम्ही बदलून टाकला आहे. मनापासून धन्यवाद. या शुभ कर्माने तुमचे नावही भगवान श्रीरामाच्या नावाशी कायमचे जोडले गेले. नमो राम! जय श्री राम!'

भारतीय जनता पार्टी (भाजप) महाराष्ट्राच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलने ट्विटरवर त्यांचे कौतुक केले आहे आणि त्यांच्या पत्राचा फोटो देखील शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की, 'प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून त्यांचे आभार मानले आहेत. श्रीराम ५ शतके वनवासात राहिले. शेवटी तो वनवास संपला. तेही मोदीजींच्या प्रयत्नांमुळे.. यासाठी शिल्पाजींनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. याबरोबरच, तुम्हीही पंतप्रधानांचे आभार मानणारे पत्र namo@bjpcc.org या ईमेल आयडीवर मेल करा, काही निवडक पत्रांना आम्ही मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिध्दी देऊ. असेही भाजपने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, २२ जानेवारीला पार पडलेल्या या सोहळ्याला अनेकांनी हजेरी लावली होती. रामायण मालिकेत राम, सीता आणि लक्ष्मण यांची भूमिका अजरामर करणाऱे कलाकार देखील उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com