Raj Kundra Pornography Case : राज कुंद्रा, शर्लीन चोप्राला सुप्रीम कोर्टाचा दिलासा, जामीन मंजुर

पोर्नोग्राफी प्रकरणी आरोपी असलेल्या राज कुंद्रा, शर्लीन चोप्रा यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा मिळाला आहे
Raj kundra
Raj kundra Dainik Gomantak
Published on
Updated on

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला सुप्रीम कोर्टाकडुन दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने राज कुंद्रासह मॉडेल शर्लिन चोपडा, पूनम पांडे आणि उमेश कामत या सर्वांना अश्लील व्हिडीओ बनवणे आणि त्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवल्याच्या प्रकरणात जामीन दिला आहे आहे. पण हा जामीन देताना सुप्रीम कोर्टाकडुन काही अटी घालण्यात आल्या आहेत. तपासात सहकार्य करण्याची सुचना सुप्रीम कोर्टाकडुन करण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात महाराष्ट्र सायबर पोलीसांनी पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा , शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे या सर्वांच्या विरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली होती. राज कुंद्रा (Raj Kundra) याने मुंबई परिसरातल्या फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये पॉर्न फिल्म्स शुट करून त्या ओटीटी विकल्याचा आरोप या चार्जशीटमध्ये करण्यात आला होता.

हा व्यवहार करोडो रुपयांमध्ये करण्यात आला होता अशीही माहिती नंतर मिळाली होती. पण यावर राज कुंद्रा याचे वकील प्रशांत पाटील यांनी या सर्वांशी राज कुंद्रा यांचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले होते. चार्जशीटमध्ये म्हटल्याप्रमाणे या पॉर्न फिल्म्समध्ये शर्लीन चोप्रा (Sherlyn Chopra) आणि पूनम पांडे(Poonam Pandey) यांनी काम केले होते.

Raj kundra
Ved Trailer Releases: रितेश-जेनेलियाच्या 'वेड' चा दमदार ट्रेलर आउट

हे प्रकरण जेव्हा उघडकीस आले तेव्हा बॉलीवूडसह सगळीकडे खळबळ उडाली होती. राज कुंद्रा अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती असल्याने या प्रकरणाची चांगलीच चर्चा झाली होती. या हाय प्रोफाईल प्रकरणावर पोलीसांकडुन त्वरीत कारवाईही झाली होती. आता राज कुंद्रा, शर्लीन चोप्रा आणि पूनम पांडे यांना जामीन मिळाल्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com