Rahul Mahajan : 'राहुल महाजन'ने तीन लग्नं केली ;पण एकाही पत्नीला पोटगी नाही मिळाली...

भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन त्याच्या लग्नाच्या बातम्यांमुळे आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Rahul Mahajan
Rahul MahajanDainik Gomantak
Published on
Updated on

वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून मनोरंजन विश्वात सतत चर्चेत असणारा राहुल महाजन त्याच्या लग्नांंमुळे नेहमीच वादाच्या केंद्रस्थानी असतो. राहुलची एकूण तीन लग्नं झाली आहेत.

आता त्याचं तिसरं लग्नही टिकू शकलं नाही. तिसऱ्या पत्नीपासूनही राहुलने घटस्फोट घेतल्याच्या बातम्या समोर येत आहेत. घटस्फोटासोबत राहुलने लग्नानंतर पत्नीला न दिलेल्या पोटगीचीही आता चर्चा होत आहे.

अलीकडेच, राहुल महाजनचा तिसरी पत्नी नताल्या इलिनाशी घटस्फोट झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यावेळी राहुलने वेगळे होण्याबाबत न बोलण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता तो चर्चेसाठी तयार झाला आहे. 

राहुल म्हणाला

आपल्या घटस्फोटाबद्दल बोलताना राहुल म्हणाला, 'मी खूप संवेदनशील आहे, पण दाखवत नाही'. घटस्फोट आणि विभक्त होण्याबद्दल बोलताना राहुलने माहिती दिली.

'माझ्या आयुष्यात जणू मोठा भूकंपच झाला आहे. हादरे अजूनही इकडे तिकडे आहेत. खूप विध्वंस झाला आहे, पण जीवन चालू आहे. तुम्हाला खंबीर होण्याशिवाय पर्याय नाही.

राहुल महाजन म्हणाला

मिळालेल्या माहितीनुसार नताल्याने गेल्या जुलै 2022 मध्ये राहुल महाजनसोबच संबंध संपवले आणि जानेवारी 2023 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. 48 वर्षीय राहुल तेव्हापासून त्याच्या आयुष्यात काय चालले आहे यावर माध्यमांशी बोलला नाही ;पण त्याने आता याबद्दलची माहिती दिली.

ETimes ला दिलेल्या मुलाखतीत राहुल महाजन म्हणाला, 'मी कदाचित दाखवणार नाही, पण मी खूप संवेदनशील आहे. याशिवाय माझ्या वडिलांच्या मृत्यूपासून आजपर्यंत मी माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कधीही चर्चा केलेली नाही. मला अजूनही नताल्याबद्दल प्रेम आणि आदर आहे.

राहुलला त्याच्या आणि नताल्यामध्ये काय बिनसलं , ज्यामुळे त्यांचा घटस्फोटा झाला या कारणावर बोलायचं का नाही?  यावर तो म्हणाला, 'मी याबद्दल बोललो तर ती एकतर्फी कथा असेल आणि ती चुकीची असेल. 

मला अजूनही तिच्याबद्दल प्रेम आणि आदर आहे. प्रेम कधी मरत नाही. मी तिच्या संपर्कात नाही आणि ती कुठे आहे हे देखील मला माहित नाही. पण प्रेम असेच संपत नाही. राहुलने असेही सांगितले की, मला कधीही मूल व्हायचे नव्हते.

मुलासाठी घटस्फोट

राहुलच्या घटस्फोटानंतर , नेटिझन्सनी लगेच असा अंदाज लावला की राहुलला मूल हवे होते म्हणून दोघांनी वेगळे केले पण राहुलने स्पष्ट केले की, 'मला या नात्यात कधीही मूल नको होते. आम्ही कधी प्रयत्न केला नाही. फक्त डिम्पी आणि मी मूल होण्याचा प्रयत्न केला पण तसे झाले नाही. 

नताल्या आणि माझी मूल होण्याची कोणतीही योजना नव्हती किंवा मला कधीही एकाची इच्छा नव्हती. मी आता 48 वर्षांचा आहे, मला आता मुले नको आहेत. 

माझ्या कोणत्याही घटस्फोटात मी पोटगी म्हणून एक रुपयाही दिलेला नाही. माझे सर्व घटस्फोट परस्पर संमतीने झाले आहेत.

Rahul Mahajan
Steve Harwell : जगप्रसिद्ध गायकाचं लिव्हर निकामी, मृत्यूशी संघर्ष सुरू...

डॉक्टरांना भेटायला सुरूवात केली आहे.

आपल्या आरोग्यावर झालेल्या या गोष्टींच्या परिणामांबद्दल बोलताना राहुल म्हणाला, 'मी यावेळी भावनिकदृष्ट्या नीट आहे. मी सावरलो आहे. मी अलीकडेच डॉक्टरांना भेटायला सुरुवात केली. 

मी कोणालातरी भेटू शकतो, मी कोणाशी बोलू शकतो, पण मी प्रेम करू शकत नाही कारण मला भीती वाटते. मी माझ्या थेरपिस्टसोबत त्या भीतीवर काम करत आहे. मला सावरण्याची गरज आहे, मी फिट नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com