
जगप्रसिद्ध गायक स्टिव्ह हार्वेल यांच्या चाहत्यांसाठी एक दु:खद बातमी समोर आली आहे. आपल्या संगीताने जगभरातील चाहत्यांना वेड लावणाऱ्या स्टिव्हचं लिव्हर निकामी झालं असुन तो आता शेवटचे श्वास घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार स्टिव्हकडे आता काहीच क्षण उरले आहे. चला पाहुया यासंदर्भातले सविस्तर वृत्त.
हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार 'स्मॅश माऊथ'चा प्रमुख गायक स्टीव्ह हार्वेल यकृत निकामी झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी संघर्ष करत आहे.
स्टीव्हच्या बँड प्रतिनिधीने एंटरटेनमेंट वीकलीला सांगितले की, 56 वर्षीय स्टिव्हवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि सध्या ते यकृत निकामी झाल्यामुळे संघर्षाच्या अंतिम टप्प्यात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार स्टीव्हच्या ब्रँड प्रतिनिधीने सांगितल्याप्रमाणे "स्टिव्हचे मित्र आणि कुटुंब स्टीव्हची चौकशी करण्यासाठी हॉस्पीटलला भेट देत आहेत. स्टीव्हकडे आता फक्त एक आठवडा उरला आहे. “आम्ही आशा करतो की या कठीण काळात लोक स्टीव्ह आणि त्याच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करतील,” .
स्टीव्ह गेल्या काही वर्षांपासून आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांशी झुंजत होता. 2016 मध्ये अर्बाना, इल येथे स्टेजवर परफॉर्म करत असताना कोसळल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
मेम्फिस, टेनेसी येथे एका परफॉर्मन्सपूर्वी साऊंड टेस्टींग करताना त्याला श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे त्याचे अनेक शो पुढच्या वर्षी रद्द करण्यात आले.
2021 मध्ये, स्टीव्हने 'स्मॅश माऊथ' मधून काही काळ विश्रांती घेण्याची घोषणा केली. स्टीव्हच्या प्रतिनिधीने सांगितले की तो हार्ट फेल्युअर आणि कार्डिओमायोपॅथीने ग्रस्त आहे. 2015 मध्ये त्याच्या या रोगाचे निदान झाले होते.
स्टीव्हने त्याच्या बिघडलेल्या प्रकृतीचे कारण देत बँडमधून निवृत्तीची घोषणा केली. शिवाय स्टीव्ह वेर्निकच्या एन्सेफॅलोपॅथीशी देखील झुंज देत होता.
स्टीव्हच्या 2021 मध्ये न्यूयॉर्कच्या बिग सिप फेस्टिव्हलमध्ये त्याच्या परफॉर्मन्सदरम्यान स्टेजवर अस्वस्थ झाला आणि त्यानंतरच त्याने निवृत्तीची घोषणा करण्यात आली .
स्टीव्हने त्या वेळी दिलेल्या निवेदनात म्हटले होते "मी लहान होतो तेव्हापासून, एक रॉकस्टार बनण्याचे स्वप्न पाहत होतो आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी खूप भाग्यवान आहे,"
“माझ्या बँडमेट्ससाठी, एवढ्या वर्षात तुमच्यासोबत परफॉर्म करणे हा एक सन्मान आहे आणि मी या जंगली प्रवासाला जातोय . आमच्या निष्ठावान आणि प्रेम करणाऱ्या चाहत्यांना धन्यवाद, हे सर्व तुमच्यामुळेच शक्य झाले.
मी माझ्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांमधून सामर्थ्य मिळविण्याचा आणि शेवटच्या वेळी तुमच्यासमोर येण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु मला ते शक्य झाले नाही.”