Vishal Bhardwaj : "मला शांतता आवडते नकारात्मकता नाही" विशाल भारद्वाज यांनी सांगितलं 'द केरळ स्टोरी' न पाहण्याचं कारण

दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी द कश्मिर फाईल्स आणि द केरळ स्टोरी या चित्रपटांवरचं आपलं मत सांगितलं आहे.
Vishal Bhardwaj on The Kashmir Files, The Kerla Story
Vishal Bhardwaj on The Kashmir Files, The Kerla StoryDainik Gomantak
Published on
Updated on

Vishal Bhardwaj on The Kashmir Files and The Kerala Story : ओंकारा, मकबूल, हॅम्लेट, हैदर यांसारख्या अभिजात चित्रपटांची निर्मिती करणारे दिग्दर्शक विशाल भारद्वाज भारतीय सिनेमातील एक प्रसिद्ध नाव आहे.

जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपियरच्या क्लासिक नाटकांवर आधारित चित्रपट बनवून त्यांना भारतीय मातीत सजवणारे महान दिग्दर्शक म्हणून विशाल भारद्वाज यांचं नाव घेतलं जातं.

विशाल भारद्वाज यांनी सांगितलं कारण

सध्या विशाल भारद्वाज सोशल मिडीयावर प्रचंड चर्चेत आहेत. द कश्मिर फाईल्स आणि द केरळ स्टोरी या चित्रपटांवर केलेल्या विधानानंतर दिग्दर्शक विशाल भारद्वाज नेटीजन्सच्या चर्चेचा विषय बनले आहेत.

विशाल भारद्वाज द कश्मिर फाईल्स आणि द केरळ स्टोरी हे चित्रपट पाहिलेले नाही. चित्रपट का पाहिले नाहीत याचं कारण सांगताना विशालजींनी नकारात्मक गोष्टी टाळत असल्याचंही सांगितलं आहे.

द कश्मिर फाईल्स आणि द केरळ स्टोरी

काश्मिर फाइल्सचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले होते आणि 2023 साली हा चित्रपट थिएटरमध्ये आला होता. सुदीप्तो सेन दिग्दर्शित द केरळ स्टोरी 2023 सालीच रिलीज झाला. या दोन्ही चित्रपटांनी देशभरात चांगलाच वाद ओढवून घेतला आहे.

कश्मिर फाईल्समध्ये कश्मिरच्या पंडितांवर झालेला अन्याय आणि त्याची तीव्रता दाखवण्याचा प्रयत्नि दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्रींनी केला तर द केरळ स्टोरीमधुन सुदिप्तो सेन यांनी केरळमध्ये इसिस या दहशतवादी संघटनेत काही मुली जबरदस्तीने भरती केल्याची गोष्ट सांगितली आहे.

नकारात्मकता आवडत नाही...

विशाल भारद्वाज यांनी नुकतंच या दोन्ही चित्रपटांवर मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले "द केरळ स्टोरी आणि द कश्मिर फाईल्स हे चित्रपट मी जाणीवपूर्वक पाहिले नाहीत. या चित्रपटांबद्दल मी ज्या प्रकारच्या गोष्टी ऐकत होतो, त्याचा प्रभाव माझ्यावर पडावा अशी माझी इच्छा नव्हता. हे ऐकले की ते माझ्या मित्रांचे आणि माझ्या ओळखीच्या लोकांचे प्रोपगंडा चित्रपट आहेत...

म्हणूनच मला यापासून दूर राहायचे होते कारण, माझ्यासाठी, हा एक अतिशय संवेदनशील विषय आहे. जर चित्रपटात खूप नकारात्मकता असेल तर मला यापासून दूर राहायचे आहे. मला माझी शांतता आवडते. म्हणून, मला हे चित्रपट बघायचे नव्हते."

चित्रपटांचा वापर प्रचार म्हणून करु नये

हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार विशालजी पुढे म्हणाले " चित्रपट निर्मात्यांनी अशा कथांना संवेदनशीलतेने हाताळावे आणि त्याचा प्रचार म्हणून वापर करू नये, अशी माझी इच्छा आहे. सिनेमा ही एक अशी गोष्ट आहे की आपण त्याचा आपल्याला हवा तसा वापर करू शकतो.

जर लोक ते स्वीकारत असतील आणि पाहत असतील, तर आपण ते स्वीकारले पाहिजे. एक समाज म्हणून आपण बदलत आहोत,"

यशासोबत वादही

द काश्मीर फाईल्स (2022) आणि द केरळ स्टोरी (2023) या दोन्ही चित्रपटांनी चांगली कमाई केली पण यासोबतच चित्रपटावर मोठे वादही झाले. 

काश्मीर फाइल्सचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले होते. यात अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी यांनी भूमिका केल्या होत्या..

Vishal Bhardwaj on The Kashmir Files, The Kerla Story
OTT Release : लव्ह स्टोरी, सस्पेन्स - थ्रीलर पाहायला आवडतं?...मग वेबसिरीज, चित्रपटांची ही खास मेजवानी तुमच्यासाठीच

द केरळ स्टोरीचा वाद

केरळ कथा सुदीप्तो सेन यांनी दिग्दर्शित केली होती. यात केरळमधील हजारो तरुणींना इस्लामिक स्टेट (IS) मध्ये सामील होण्यासाठी ब्रेनवॉश कसे करण्यात आले याची गोष्ट सांगितली आहे.

ही कथा खोटी असल्याची टिकाही करण्यात आली. या चित्रपटाला राजकीय वळणही मिळाले.या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com