आतातरी पाकिस्तानी कलाकार भारतात येऊ शकतात का? रईस फेम दिग्दर्शक राहुल ढोलकियाचा प्रश्न

पाकिस्तानी क्रिकेटर्स भारतात 7 वर्षांनी परतले त्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
Rahul Dholkia
Rahul DholkiaDainik Gomantak
Published on
Updated on

Director Rahul Dholkia on Pakistani Actors : भारत - पाकिस्तानमधील राजकिय तणाव सर्वांच्याच परिचयाचा आहे. या वादाचे परिणाम क्रिकेटवरही झाले.

दोन्ही देशातील तणावाच्या स्थितीमुळे क्रिकेटर्समध्येही उदासिनता होती. पण आता पाकिस्तानी क्रिकेटर्स 7 वर्षानंतर भारतात आल्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत.

राहुल ढोलकियांचा प्रश्न

पाकिस्तानी क्रिकेटपटू सात वर्षांत प्रथमच 27 सप्टेंबरला भारतात दाखल झाले. आगामी आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक खेळण्यासाठी पाकिस्तानी क्रिकेट संघ भारतात आला आहे.  यावर आता वेगवेगळ्या क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत.

शाहरुख खानची मुख्य भूमीका असणारा रईस चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनीही X (पूर्वीचे ट्विटर)वर आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानी क्रिकेटर्सच्या भारतात येण्यावर ढोलकिया यांनी आतातरी पाकिस्तानी कलाकार भारतात येऊ शकतात का? एक प्रश्न विचारला आहे.

क्रिकेटर्स आले आता कलाकार येऊ शकतात का?

राहुल ढोलकियांनी ट्विट केले की, "आता पाकिस्तानी क्रिकेटर्स अधिकृतपणे येथे आले आहेत, आम्ही पाकिस्तानी कलाकारांनाही आमच्या चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी आमंत्रित करू शकतो का? की संगीतकारांना परफॉर्म करण्यासाठी?"

राहुल ढोलकिया म्हणतात

राहुल ढोलकियाने शाहरुख खान -स्टारर रईसचे दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता.

या चित्रपटाने पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानचे हिंदी चित्रपटात पदार्पण केले होते. पण उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांवर लादण्यात आलेल्या बंदीमुळे तिला देशात चित्रपटाचे प्रमोशन करण्याची परवानगी नव्हती.

रईस रिलीज झाला होता...

2017 मध्ये रईस रिलीज झाला त्यावेळी पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, "शाहरुख खान, रितेश बत्रा, फरहान अख्तर किंवा राहुल असोत, ते सर्व खूप अप्रतिम आहेत. रईससाठी हे महत्त्वाचे होते.

तिची मुलाखत क्लिप 'स्वीट' म्हणत राहुल ढोलकियाने 2017 मध्ये ती X वर शेअर केली होती आणि ट्विट केले होते, "खूप गोड! कुठेतरी मला वाटते की आम्ही तिच्यावर अन्याय केला आहे. आमचे लोक विसरले की ती एक कलाकार आहे, शत्रू नाही! आम्ही तिचा अधिकार काढून घेतला आहे. एक अभिनेत्री म्हणून! अन्यायकारक. माहिरा खान, तू अद्भुत आहेस आणि रईसचा भाग असल्याबद्दल धन्यवाद."

उरी हल्ल्याचा परिणाम

2016 मध्ये उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये काम करण्यास बंदी घालण्यात आली होती .

 2019 मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याची घोषणा केली होती.

पाकिस्तानी कलाकारांवर बंदी

“पाकिस्तान सरकारने भारतीय चित्रपटांवर पाकिस्तानमध्ये बंदी घातल्याच्या संदर्भात AICWA (ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन) सर्व चित्रपट उद्योगांना पाकिस्तानी कलाकार, संगीतकार आणि डिप्लोमॅट यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध पूर्णपणे थांबवण्याचे आवाहन करते,” असे निवेदन जारी केलं होतं .

Rahul Dholkia
Gauri Khan : "हा जवानच्या बॉक्स ऑफिसचा ग्लो आहे" गौरी खानच्या त्या सेल्फीवर यूजर्सच्या विनोदी प्रतिक्रिया

माहिरा खान म्हणाली होती

2021 च्या एका मुलाखतीत फिल्म कंपेनियनशी बोलताना , माहिरा या बंदीबद्दल म्हणाली होती, “मला वाटते, हे प्रत्यक्ष अनुभवले आहे, हे दुःखदायक आहे. जेव्हा मी याबद्दल विचार करते तेव्हा वाईट वाटते . 

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com