Gauri Khan : "हा जवानच्या बॉक्स ऑफिसचा ग्लो आहे" गौरी खानच्या त्या सेल्फीवर यूजर्सच्या विनोदी प्रतिक्रिया

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानच्या बेगमने अर्थात गौरी खान तिच्या नवीन फोनवर घेतलेली सेल्फी पोस्ट करताच चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Gauri Khan Viral Photo
Gauri Khan Viral Photo Dainik Gomantak
Published on
Updated on

Gauri Khan Viral Photo on Social Media : शाहरुख खानच्या जवान चित्रपटाने नुकताच 1 हजार कोटींचा आकडा पार केल्यानंतर शाहरुख खानच्या चर्चां बी टाऊनसह सोशल मिडीयावर घुमू लागल्या आहेत.

शाहरुख खानची पत्नी गौरी खानने नुकत्याच शेअर केलेल्या एका सेल्फीवर चाहत्यांनी दिलेल्या विनोदी प्रतिक्रियांमध्येही आता जवानच्या कमाईचं कौतुक करण्यात येत आहे.

जवानची कमाई

7 सप्टेंबरला रिलीज झालेल्या जवानने 22 व्या दिवशी जगभरातल्या बॉक्स ऑफिसमध्ये 1 हजार कोटींची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर नवनवे उच्चांक गाठत जवानने चाहत्यांसह इंडस्ट्रीलाही थक्क करुन सोडले आहे.

गौरीने शेअर केला सेल्फी

गौरी खानने तिच्या इंस्टाग्रामवर हँडलवर एक सेल्फी शेअर केला आणि साहजिकच चाहत्यांनी तिचा कमेंट सेक्शन शुभेच्छा आणि कौतुकाने भरुन टाकला. 

गौरीच्या या पोस्टवर कमेंट करताना एका युजरने कमेंट करत लिहिले "जगभरातील बॉक्स ऑफिसवर ₹ 1000 कोटींचा गल्ला कमावणाऱ्या जवानची ही चमक आहे . गौरी खान शाहरुखच्या जवानची सहनिर्माती आहे.

गौरीने घेतला नवीन फोन

आपल्या नवीन मोबाईलवरुन सेल्फी शेअर करताना गौरीने इंस्टाग्रामवर लिहिले की, “फक्त एक सेल्फी ट्राय केला कॅमेरा खूप चांगला आहे. iPhone 15 Pro Max.” 

तिच्या पोस्टला फक्त एका तासात जवळपास 50 हजार लाईक्स मिळाले. अभिनेत्री प्रीती झिंटानेही गौरीच्या सेल्फीसोबत हार्ट इमोजी पोस्ट केली आहे.

Gauri Khan Viral Photo
Michael Gambon: हॅरी पॉटरच्या प्रोफेसर 'डंबलडोअर'ने घेतला जगाचा निरोप, मायकेल गँबन यांचे निधन

यूजर्सच्या कमेंटस

एका चाहत्याने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले, "गौरी प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक सशक्त, हुशार आणि मेहनती स्त्री असते." दुसरा म्हणाला, "फक्त आश्चर्यकारक." 

“तुझ्या सुंदर राणीसाठी @iamsrk ची कमेंट्स देण्याची वाट पाहत आहे!” एका युजरने अशीही कमेंटमध्ये विनंती केली, “तुमच्या पतीलाही सेल्फी पोस्ट करायला सांगा.” जवानच्या यशाचा संदर्भ देत एका चाहत्याने लिहिले, “बॉक्स ऑफिस ग्लो.”

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com