Praan - Rajesh Khanna: म्हणुन प्राण आणि राजेश खन्ना यांना एका चित्रपटात घ्यायला निर्माता दिग्दर्शक घाबरायचे...

अभिनेता प्राण आणि राजेश खन्ना यांना चित्रपटात कास्ट करताना दिग्दर्शकाची मोठी पंचाईत व्हायची
Praan 
Rajesh Khanna
Praan Rajesh KhannaDainik Gomantak
Published on
Updated on

Praan - Rajesh Khanna: अभिनेते प्राण यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे? शतकातील मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्याबद्दल तर तुम्हाला माहिती आहेच, पण शतकातील खलनायकाबद्दल तुम्हाला माहिती आहे का.

हा तो खलनायक होता, ज्याचे तिरकस हसणे आणि डोळ्यातून टक लावून पाहणे प्रेक्षकांच्या मनात भीती निर्माण करायचे तेच ज्येष्ठ अभिनेते प्राण...

आजची गोष्ट ज्येष्ठ अभिनेते प्राण यांची आहे... त्यांचे कॅचफ्रेस बरखुरदार आजही हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांची आठवण करून देतात... प्राण यांचा जन्म जुन्या दिल्लीत झाला पण त्यांचा बहुतेक काळ लाहोरमध्ये गेला.प्राण यांचे पूर्ण नाव 'प्राण किशन सिकंद'

पण चित्रपटात ते फक्त प्राण म्हणुनच ओळखले गेले. दिल्लीत त्याचे कुटुंब खूप समृद्ध होते...ते लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते ,विशेषतः गणितात...त्यांचे वडील सुद्धा इंजिनियर होते प्राण यांना पान खाण्याचा शौक होता आणि या छंदामुळेच ते चित्रपटांमध्ये गेले…

प्राण यांना कधीही नायक म्हणुन संधी मिळाली नाही. त्यांनी नेहमी खलनायक म्हणुनच काम केलं. आणि याबाबतीत त्यांनी कधीही तक्रार केली नाही.

कारण त्यांच्या मते हिरवळीवर नाचणं आणि रोमान्स करणं त्यांना आवडत नव्हतं. प्राण हे एकमेव असे खलनायक होते जे हिरोपेक्षा जास्त पैसे घेत होते.

त्या काळात राजेश खन्ना हे सर्वात जास्त पैसे घेणारे अभिनेते होते. त्यामुळे साहजिकच निर्माते दिग्दर्शक दोघांना एकत्र घेण्याचा विचार करायचे विचार करायचे नाहीत त्याचं कारण चित्रपटाच्या बजेटवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असायची.

Praan 
Rajesh Khanna
Pariniti Viral Video : काय सांगता? राघव चढ्ढा आणि परिणिती चोप्रा लवकरच बोहल्यावर चढणार...

प्राण यांनी साकारलेली सगळीच पात्रं जरी अविस्मरणीय असली तरी जंजीर चित्रपटात त्यांनी साकारलेलं शेरखानचं पात्र आजही प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडून गेलं आहे.

प्राण यांचं या चित्रपटातलं काम अमिताभ बच्चन यांच्याइतकंच लक्षात राहतं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com