Pariniti Viral Video : काय सांगता? राघव चढ्ढा आणि परिणिती चोप्रा लवकरच बोहल्यावर चढणार...

अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या अफेअरची जोरदार चर्चा सुरू आहे.
Pariniti Chopada 
Raghav Chadha
Pariniti Chopada Raghav Chadha Dainik Gomantak
Published on
Updated on

Pariniti Viral Video: अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांच्या लग्नाच्या चर्चा सध्या सोशल मिडीयावर सुरू आहे. परिणिती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

गेल्या काही काळापासून दोघे एकमेकांना डेट करत असल्याची लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा आहे. 

आम आदमी पक्षाचे आणखी एक खासदार संजीव अरोरा यांनी परी-राघवच्या अफेअरच्या बातम्यांना खतपाणी घातले आहे. संजीव अरोरा यांनी काल ट्विट करून त्यांच्या नात्याची माहिती दिली होती. त्याचवेळी आता याप्रकरणी परिणीतीची प्रतिक्रियाही आली आहे. 

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. खरं तर, त्याचे असे झाले की नुकतीच परी विमानतळावर स्पॉट झाली. यादरम्यान पापाराझींनी परिणितीला तिच्या आणि राघव चढ्ढा यांच्या नात्याबद्दल प्रश्न विचारला. 

यादरम्यान अभिनेत्री परिणीतीच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे होते. पापाराझींच्या प्रश्नांवर परिणीती उघडपणे काहीही बोलली नाही, पण तिच्या चेहऱ्यावरचे हास्य सगळं काही सांगून गेलं.

Pariniti Chopada 
Raghav Chadha
Tu Jhoothi Main Makkaar Box Office Collection: रणबीर-श्रद्धाच्या ‘तू झुठी मैं मक्कार’ने पार केला 100 कोटींचा टप्पा...

शेअर केले आहे. यामध्ये परिणीती विमानतळाच्या दिशेने जाताना दिसत आहे. यादरम्यान पापाराझी विचारतात, 'मॅडम ही बातमी येत आहे, याची काही न्यूज आहे का? काही कल्पना? कमेंट ?' हे ऐकून परिणीती हसू लागली.

 पापाराझी म्हणाले, 'तुम्ही लाजत आहात. काहीतरी सांगा मॅडम. यानंतर परिणिती तिच्या कारमध्ये बसली आणि हसत हसत म्हणाली, 'धन्यवाद! टाटा शुभ रात्री.' यानंतर पापाराझी म्हणाला, 'धन्यवाद मॅडम! आपण समजू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com