अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि वाद विवाद हे नवे समीकरण पठाणच्या बेशरम रंग गाण्यापासून सुरू आहे. बेशरम रंग गाण्याचा वाद इतका पेटला होता की दीपिकावर बिहार राज्यात भावना दुखावल्याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला होता.आता एक नवीन वादग्रस्त मुद्दा समोर आला आहे, हा मुद्दा दीपिकाशी थेट संबंधित नसला तरी तिच्या आई-वडिलांशी आहे.
दीपिका पदुकोणचे आई-वडीलप्रकाश पदुकोण आणि उज्जला नात्याने एकमेकांचे सेकंड कजीन लागतात अशी बातमी समोर आली आणि सोशल मिडीयावर हलकल्लोळ माजला... एका जुन्या मुलाखतीत प्रकाश पदुकोण बॅडमिंटन कारकिर्दीतील आव्हानात्मक टप्प्याबद्दल बोलताना असे म्हटले होते की, 'माझे सेकंड कजीन उज्जला हिच्याशी लवकरच लग्न झाले आणि आम्ही कोपनहेगनला गेलो...
' ही बातमी आल्यापासून नेटिझन्स त्यावर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. युजरच्या एका गटाने 'दक्षिण भारतात ही एक सामान्य प्रथा आहे' असे सांगून एकसंध विवाहाच्या संकल्पनेचे समर्थन केले आहे
नेटिझन्सचा दुसरा एक गट मात्र या गोष्टीवर नाराज झाला आणि त्याला 'अनाचार' म्हणून टॅग केले. काहींनी तर 'गेम ऑफ थ्रोन्स' मधील टार्गेरियन्स सारखीच ही संकल्पना असल्याचं म्हटलं आहे . गेम ऑफ थ्रोन या गाजलेल्या वेब सिरीजमध्ये सरसी लॅनिस्टरचं पात्र ज्यांना आठवते त्यांना नेटीजन्सच्या बोलण्याचा रोख कळला असेल.
दीपिका पदुकोणचे वडील प्रकाश पदुकोण हे प्रसिद्ध माजी बॅडमिंटनपटू आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या या मुलाखतीचे पडसाद आता उमटायला लागले आहेत या निमित्ताने काही लोक त्यांना अनाचारी ठरवतायत तर काहींना ही गोष्ट सामान्य वाटते, यानिमीत्ताने भारतीय विवाहसंस्थेवरही काही युजर चर्चा करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.