Priyanka Chopra Viral Video : निक जोनासच्या महिला चाहतीने भर कार्यक्रमात फेकली ब्रा प्रियांकाने मग...व्हिडीओ व्हायरल

प्रियांका चोप्राचा पती निक जोनासच्या शोमध्ये एक प्रकार घडला ज्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय
Priyanka Chopra
Nick Jonas
Priyanka Chopra Nick JonasDainik Gomantak

प्रियांका चोप्रा आणि तिचा अमेरिकन गायक पती निक जोनास यांच्यातील बॉन्डिंग सर्वांनाच माहिती आहे. सार्वजनिक ठिकाण असो किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असो, एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करण्यात दोघेही मागे हटत नाहीत. प्रियांकाचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, जो निकच्या कॉन्सर्टचा आहे. 

निकच्या कॉन्सर्टमध्ये एका महिला चाहत्याने तिचा अंडरगारमेंट फेकण्याचा प्रयत्न केला, पण प्रियांकाने त्यांना पाहिले आणि मग असे कृत्य केले की महिला चाहत्यांनाही धक्का बसला.

प्रियांका चोप्राचा निक जोनासच्या कॉन्सर्टचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, निकची एक महिला चाहती तिचा अंडरगारमेंट फेकण्याचा प्रयत्न करते, पण तेवढ्यात तिथून जाणाऱ्या प्रियांकाने फॅनच्या हातातून अंडरगारमेंट हिसकावून घेतलं आणि पाठीवर लटकवलं आणि पुढे चालत गेली.

 हे करत असताना ती हसायला लागते आणि तिला पाहून तिथे उपस्थित असलेले लोकही हसतात. एकंदरीत, प्रियंका एका सामान्य पत्नीप्रमाणे तिच्या पतीसाठी अशी कृती करताना दिसली.

Priyanka Chopra
Nick Jonas
Amazon Prime New Web Series : अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या आगामी ओरिजनल सिरीज ’जुबिली’चा ट्रेलर प्रदर्शित

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा विवाह जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये 2018 साली झाला. दोघांचे लग्न ख्रिश्चन आणि हिंदू रितीरिवाजानुसार झाले होते. या लग्नसोहळ्यात फक्त मित्र आणि कुटुंबीयच सहभागी झाले होते. यानंतर या जोडप्याने दिल्ली आणि मुंबईमध्ये रिसेप्शन पार्टी आयोजित केली.

प्रियांका आणि निक आता मुलगी मालतीचे आई-वडील आहेत. मालतीचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून झाला आहे. काही दिवसांपूर्वी या अभिनेत्रीने मुलीचा चेहरा जगाला दाखवला होता. पूर्वी ती इमोजी लावून मुलीचा फोटो शेअर करायची.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com