Adipurush New Song : राम - सीतेचा विरह अन् पुन्हा भेटण्यासाठी तळमळ 'आदिपुरुष'चं नवं गाणं रिलीज

आदिपुरुष या चित्रपटातलं नवं गाणं नुकतंच रिलीज झालं आहे.
Adipurush New Song
Adipurush New SongDainik Gomantak
Published on
Updated on

ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष या बहुचर्चित आगामी चित्रपटातील नवीन गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. या चित्रपटातले एक गाणे याआधी रिलीज झाले आहे. या गाण्यात प्रभुश्रीरामचंद्र आणि सीतामाता यांच्या विरहाचे सुंदर चित्रण केले आहे.

आदिपुरुषचं हे नवं गाणं राम आणि सीता यांच्या अपहरणानंतरची एकमेकांसाठीची तळमळ सुंदरपणे प्रतिबिंबित करते. गाणं पाहताना प्रभास आणि क्रितीने स्वत:वर काम करताना घेतलेल्या मेहनतीची कल्पना येते.

राम सिया राम

ओम राऊतच्या आगामी चित्रपट आदिपुरुष मधील नवीन गाणे , ज्याचे नाव राम सिया राम आहे, आता बाहेर आले आहे आणि राघव ( प्रभास ) आणि जानकी (क्रिती सेनॉन) यांच्या अपहरणानंतर एकमेकांसाठी असलेली उत्कंठा या गाण्यात खूपच सुंदरपणे प्रतिबिंबित होत आहे. 

हे गाणे लोकप्रिय भजनाची पुनर्निर्मित आवृत्ती आहे. काही भाग मोरांमध्ये बसून बोटीतून प्रवास करणाऱ्या प्रभास यांचा अभिनय वाखाखण्याजोगा आहे. हे गाणं प्रामुख्याने त्यांच्या वेदना दर्शवते कारण जानकी राघवाची म्हणजेच प्रभू श्रीरामचंद्रांची लंकेतून परत घेऊन जाण्याची वाट पाहत आहे

सचेत टंडन आणि परंपरा टंडनचं गायन

सचेत टंडन आणि परंपरा टंडन यांनी हे गाणे गायले आहे तसेच सादरीकरणासाठी संगीत दिले आहे. मनोज मुन्ताशीर शुक्ला यांनी हे गाणं लिहिलं आहे. हनुमानाची मदत घेऊन जानकीला परत आणण्यासाठी मनाने तुटलेला राघव कसा तयार होतो याची झलकही या गाण्यात दाखवण्यात आली आहे. मात्र, लंकेशच्या भूमिकेत सैफ अली खानची झलक अजूनही दिसत नाही .

ओम राऊत म्हणतो...

हे गाणं ट्विटरवर शेअर करताना दिग्दर्शक ओम राऊत यांनी लिहिले, “आदिपुरुषाचा आत्मा. राम सिया राम" जय श्री राम नावाच्या पहिल्या गाण्याप्रमाणे हे गाणेही हिंदी, तेलगू, कन्नड, तमिळ आणि मल्याळम भाषेत रिलीज झाले.

Adipurush New Song
Suniel Shetty : "मी त्यांना शिव्या द्यायचो, पोलिस म्हणायचे वेडा आहेस का"? सुनिल शेट्टीने सांगितला अंडरवर्ल्डच्या धमक्यांचा किस्सा..

क्रिती झाली भावुक

काही आठवड्यांपूर्वी या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी क्रिती म्हणाली होती, "मी आज खूप भावूक झाली आहे, ट्रेलर पाहताना माझ्या चेहऱ्यावर हसू आले कारण हा फक्त एक चित्रपट नाही तर त्याहूनही खूप काही आहे.

हा चित्रपट बनवताना आम्ही जे अनुभवले ते विशेष होते. जानकीच्या रूपात माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मला ओमचे आभार मानायचे आहेत. तुमचा माझ्यावर विश्वास होता की मी ही भूमिका करू शकेन कारण असे खूप कमी कलाकार आहेत ज्यांना त्यांच्या आयुष्यात अशी भूमिका मिळते. मी खूप, खूप धन्य आहे."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com