Ponniyin Selvan 2 Trailer : क्या बात है! ऐश्वर्याला पर्याय नाही... 'पोन्नियन सेल्वन'चं ट्रेलर एकदा बघाच

साऊथचा बहुप्रतिक्षित पोन्नियन सेल्वनचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.
Ponniyin Selvan 2
Ponniyin Selvan 2Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Ponniyin Selvan 2 Trailer Released: साऊथचा बहुप्रतिक्षित पोन्नियन सेल्वन 2 या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असुन यातला ऐश्वर्या रायचा लूक घायाळ करणारा आहे. ऐश्वर्या राय, कार्ती आणि चियान विक्रम स्टारर 'पोनियिन सेल्वन 2' चा ट्रेलर रिलीज झाला आहे.

पहिला भाग रिलीज झाल्यापासून चाहते चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. आता PS-2 काही आठवड्यांत रिलीज होण्यासाठी सज्ज आहे, निर्मात्यांनी ट्रेलर रिलीज केला आहे.

चोल साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाची गाथा आता दुसऱ्या भागात म्हणजेच 'पोनियिन सेल्वन भाग २' मध्ये पुढे जाईल. ट्रेलर खरोखर धमाकेदार आहे. प्रत्येक सीन तयार करण्यासाठी आणि पडद्यावर जिवंत करण्यासाठी किती मेहनत घेतली आहे हे ट्रेलर दाखवते.

Ponniyin Selvan 2
Bhola Movie Twitter Reaction : टाळ्या शिट्ट्यांसह थिएटरमध्ये जल्लोष...भोला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला...

ट्रेलरची सुरुवात सिंहासनाच्या नवीन वारसाच्या घोषणेने होते. अरुणमोदींना समुद्राने नेले होते आणि आता मधुरकातन देव हे सिंहासनाचे पुढील वारस असतील असे म्हटले जाते. 

यानंतर सिंहासन आणि जमीन वाटपाचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे. विक्रम म्हणजेच आदित्य करिकलन बदला घेण्यासाठी निघतो.

Ponniyin Selvan 2
Akanksha Dubay Suicide : अभिनेत्री आकांक्षा दुबेचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला...पोलिस लवकरच अटक करणार या व्यक्तीला...

पोन्नियिन सेल्वन 2 च्या ट्रेलरमध्ये राजकुमारी नंदिनी म्हणजेच ऐश्वर्या राय बच्चन तलवार चालवताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरचं तेज आणि भाव थक्क करणारा आहे. नंदिनीने चोल साम्राज्याचा अंत करण्याचे व्रत घेतले होते आणि दुसऱ्या भागात ती तेच व्रत पूर्ण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. 

यावेळी सिंहासनासाठी चोल राज्यात तांडव होणार हे ट्रेलर पाहून स्पष्ट होत आहे. पण ही अनागोंदी काय रूप धारण करेल, हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल. पण 'पोनियिन सेल्वन 2' मधील सिंहासनाची लढाई शिगेला पोहोचणार आहे, हे यावरून स्पष्ट होते. या संघर्षाचा फायदा कोणाला होणार? नंदिनी आणि आदित्यचं काय होणार? हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल.

Ponniyin Selvan 2
Adipurush New Poster Out Now: रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर प्रभासचे चाहत्यांना मोठं गिफ्ट; नवं पोस्टर लाँच

'पोनियिन सेल्वन 2' चा ट्रेलर पाहून प्रत्येकजण उत्सुक झाला आहे आणि चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहे. मणिरत्नम दिग्दर्शित, या चित्रपटात ऐश्वर्या, कार्ती आणि विक्रम यांच्यासह शोभिता धुलिपाला, जयम रवी, त्रिशा कृष्णन, ऐश्वर्या लक्ष्मी आणि प्रकाश राज दिसणार आहेत, जे पहिल्या भागात होते. हा चित्रपट 28 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तमिळ आणि तेलुगू भाषांव्यतिरिक्त तो हिंदीतही प्रदर्शित होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Guru Ketu Conjunction Vedic Astrology 2026
supreme court verdict children internet access
datta damodar naik kerala travelogue gomantak
Daily Horoscope 20 October 2026
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com