Akanksha Dubay Suicide : अभिनेत्री आकांक्षा दुबेचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला...पोलिस लवकरच अटक करणार या व्यक्तीला...

भोजपूरी अभिनेत्री आकांक्षा दुबे आत्महत्याप्रकरणी आता या व्यक्तीला लवकरच अटक होणार आहे.
Akanksha Dubey Suicide
Akanksha Dubey SuicideDainik Gomantak

Bhojpuri Actress Akanksha Dubey Suicide Case: अभिनेत्री आकांक्षा दुबे आत्महत्या प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे. अभिनेत्री आकांक्षा दुबे हिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला असून त्यात मृत्यूचे कारण समोर आले आहे. आकांक्षा दुबे हिने वाराणसीतील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

त्यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. तेव्हापासून पोलीस या अहवालाची वाट पाहत होते, जो आता आला आहे. आकांक्षा दुबेची हत्या झाली नसल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून स्पष्ट झाले आहे.

आकांक्षा दुबेच्या आईने अभिनेत्रीचा प्रियकर समर सिंह याच्यावर हत्येचा आरोप केला होता आणि आकांक्षाकडून 5 कोटी रुपये उसने घेतल्याचा दावा केला होता. समर सिंह आपल्या मुलीला वारंवार धमकावत असल्याचा आरोप आकांक्षाच्या आईने केला होता. 

नातेवाइकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी समर सिंहविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. शवविच्छेदन अहवालात हत्येची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी समर सिंह यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आकांक्षा दुबेचा मृत्यू फाशीमुळे झाल्याचे समोर आले आहे. आकांक्षाच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमेच्या खुणा नाहीत. यावरून आकांक्षा दुबेची हत्या झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

अभिनेत्रीच्या मृत्यूमागे समर सिंहचा हात असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असली तरी. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासात आकांक्षा दुबे आणि समर सिंह लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते आणि ते एकाच घरात राहत असल्याचे समोर आले आहे. दोघे वाराणसीच्या तक्तकपूर येथील घरात एकत्र राहत होते.

Akanksha Dubey Suicide
Salman Khan Court Case : सलमानच्या विरोधातील समन्स रद्द...पत्रकाराच्या कानाखाली वाजवल्याचं होतं प्रकरण

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना शंका आहे की आकांक्षा दुबे आणि समर सिंह यांचे ब्रेकअप झाले असावे, त्यानंतर अभिनेत्री स्वतःला सांभाळू शकली नसावी आणि डिप्रेशनमध्ये गेली असावी. नैराश्यातून आकांक्षाने आत्महत्येसारखे पाऊल उचलले असावे.

 पण सध्या ठोसपणे काहीही सांगणे कठीण आहे. समर सिंग आता पोलिसांच्या रडारवर आहे. आत्महत्येच्या रात्री समरसोबत आकांक्षा एका पार्टीत सहभागी झाली होती. आता समर सिंगला पकडण्यासाठी अनेक पोलिस पथके रवाना झाली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com