Akanksha Dubey Suicide: आकांक्षा दुबेच्या आत्महत्येनंतर पळुन जाण्याच्या तयारीत असलेल्या समर सिंहला पोलिसांनी पकडलेच

आकांक्षा दुबे आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेला समर सिंहला पोलिसांनी अटक केली आहे.
Akanksha Dubey Suicide Case
Akanksha Dubey Suicide Case Dainik Gomantak
Published on
Updated on

Akanksha Dubey Suicide: बहुचर्चित अभिनेत्री आकांक्षा दुबे आत्महत्या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी आणि गायक समर सिंगला गाझियाबाद येथून अटक केली आहे. 

आकांक्षाच्या मृत्यूनंतर पोलीस समर सिंहचा शोध घेत होते. समर सिंग आणि त्याचा भाऊ संजय सिंग देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत असल्याचीही माहिती मिळाली होती . 

आकांक्षा दुबेची आई मधु दुबे यांनी मुलीच्या मृत्यूचे सर्व आरोप दोन्ही भावांवर केले होते. आकांक्षा दुबेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी समर सिंह आणि त्याचा भाऊ संजय सिंह यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसी आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने समर सिंहला गाझियाबाद येथून अटक केली आहे.

आता पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांडसाठी बनारसला नेण्याची तयारी केली आहे. आकांक्षा दुबे आत्महत्या प्रकरणात समर सिंहचा भाऊ संजय सिंह याच्यावरही अनेक आरोप झाले आहेत.

आकांक्षा दुबे 26 मार्च 2023 रोजी बनारसमधील हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळून आली होती. प्राथमिक अहवालात ही आत्महत्या असल्याचे सांगण्यात आले आहे.

त्यानंतर अभिनेत्रीची आई मधु दुबे यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आणि सांगितले की समर सिंह आणि संजय सिंह यांच्यामुळेच तिच्या मुलीने आत्महत्या केली आहे.

समर सिंगवर आरोप करताना मधु दुबे म्हणाल्या की, 'त्याने मुलीसोबत काम केले आणि जेव्हा माझ्या मुलीने पैसे मागितले तेव्हा तो तिला ब्लॅकमेल करू लागला. एवढेच नाही तर मुलीला अश्लील फोटो लीक करण्याची धमकीही दिली.

Akanksha Dubey Suicide Case
Warrant Against Ameesha Patel: अमिशा पटेलला लवकरच अटक होणार...नेमकं काय आहे प्रकरण?

आकांक्षा दुबे आणि समर सिंह लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे पोलिसांनी यापूर्वी सांगितले होते.

दोघांमध्ये ब्रेकअप झाले असावे आणि या तणावातून अभिनेत्रीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असावा. आकांक्षा दुबेलाही याआधी नैराश्याचा सामना करावा लागला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com