Warrant Against Ameesha Patel: अमिशा पटेलला लवकरच अटक होणार...नेमकं काय आहे प्रकरण?

अभिनेत्री अमिशा पटेलवर सध्या एका प्रकरणात अटकेची टांगती तलवार आहे.
Warrant Against Ameesha Patel
Warrant Against Ameesha Patel Dainik Gomantak
Published on
Updated on

Warrant Against Ameesha Patel: बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलशी संबंधित मोठी बातमी येत आहे. 'गदर 2'मुळे चर्चेत असणारी अमीषा सध्या एका प्रकरणामुळे चर्चेत आहे.

खरं तर, रांची येथील एका दिवाणी न्यायालयाने गुरुवारी अमीषा आणि तिचा व्यवसाय भागीदार कुणाल यांच्याविरुद्ध फसवणूक आणि चेक बाऊन्स प्रकरणात वॉरंट जारी केले आहे.

तक्रार दाखल करणारा अजय कुमार सिंग हा झारखंडचा चित्रपट निर्माता आहे. त्यानेच अमिषा पटेल आणि तिच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला होता.

रांचीच्या दिवाणी न्यायालयाने आपली बाजू मांडण्यासाठी समन्स बजावूनही अमीषा पटेल किंवा तिचे वकील न्यायालयात हजर न झाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी 15 एप्रिलची तारीख निश्चित करण्यात आली आहे. 

रांची जिल्ह्यातील हरमू येथील रहिवासी अजय कुमार सिंह यांनी अभिनेत्री अमिषा आणि तिच्या बिझनेस पार्टनरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. फिर्यादीनुसार, अमिषाने त्याला देसी मॅजिक नावाच्या चित्रपटात पैसे गुंतवण्यासाठी आमंत्रित केले होते.

त्यानंतर त्याने चित्रपटाच्या मेकिंग आणि प्रमोशनसाठी अमीषाच्या बँक खात्यात २.५ कोटी रुपये ट्रान्सफर केले. फिर्यादीनुसार, 2013 मध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले होते, मात्र अद्याप चित्रपट पूर्ण झालेला नाही. 

यानंतर अजयने त्याचे पैसे परत मागितले कारण अमीषा आणि तिच्या व्यावसायिक भागीदाराने चित्रपट पूर्ण झाल्यानंतर त्याचे पैसे व्याजासह परत करण्याचे आश्वासन दिले होते.

Warrant Against Ameesha Patel
Top Pakistani Serial: पाकिस्तान कंगाल असला तरी मनोरंजनाच्या बाबतीत बराच समृद्ध..या सिरीयल्स खूपच भन्नाट

तक्रारदाराने पुढे सांगितले की, वारंवार उशीर केल्यावर अमिषाने ऑक्टोबर २०१८ मध्ये त्याला अडीच कोटी आणि ५० लाख रुपयांचे दोन चेक दिले होते, जे बाऊन्स झाले.

त्याच्याविरुद्ध सीआरपीसी कलम 420 आणि 120 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com