कपिलने वाचवला हात्तीचा जिव 'पेटा'ने मानले आभार

2013 मध्ये, सुंदरला क्रूरपणे मारहाण केल्याचा व्हिडिओ देखील समोर आला होता, त्यानंतर देश-विदेशातील लोकांनी त्याला जंगलात सोडण्यास सांगितले होते.
PETA

PETA

Dainik Gomantak

Published on
Updated on

कॉमेडियन कपिल शर्मा (Comedian Kapil Sharma) आपल्या कॉमेडीने लोकांचे फक्त मनोरंजन करत नाही तर इतरांच्या मदतीने सर्वांची मनं जिंकतो. आता नुकतेच पेटा (PETA) अर्थात पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्सने (People for the Ethical Treatment of Animals) आजारी हत्तीचे प्राण वाचवल्याबद्दल कपिलचे पुन्हा एकदा आभार मानले आहेत.

PETA

पनवेलच्या फार्म हाऊसमध्ये सलमान खानला चावला साप

PETA ने ट्विट केले आणि लिहिले आहे की, कपिल शर्मा हाथी सुंदरला (Elephant) मदत केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आमच्याकडे हत्तीबद्दल एक चांगली बातमी आहे. पेटा इंडियाच्या प्रयत्नांनंतर देशातील 'सर्वात बारीक हत्ती' लक्ष्मीला कोर्टाने गैरवर्तनापासून वाचवण्यासाठी मोकळीक दिली आहे.'यावर उत्तर देताना कपिलनेही लिहिले- 'ही खूप चांगली बातमी आहे. आम्हाला तुमचा अभिमान आहे मित्रांनो. देव तुम्हाला असेच आशीर्वाद देत राहो.

2007 मध्ये लहान असताना हाती सुंदर यांना कोल्हापुरातील एका मंदिरात देण्यात आले होते. तेथे त्याच्या पायाला बेड्या ठोकून ठेवण्यात आल्या. त्याला वाईट वागणूक मिळाली. सुंदरचा हँडलर त्याला काठ्यांनी मारहाण करायचा. जेव्हा पेटा इंडियाला तिच्या दुर्दशेबद्दल कळले तेव्हा सुंदरच्या डोळ्याला दुखापत, कानाला छिद्र आणि संपूर्ण शरीरावर जखम झाल्याचे समोर आले.

PETA

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने दिला '83'चा Review

यानंतर सुंदरच्या सुटकेसाठी मोहीम राबविण्यात आली. PETA ने सुंदरला जंगलात सोडण्याची मागणी केली पण त्याच्या हँडलरने तसे करण्यास नकार दिला. 2013 मध्ये, सुंदरला क्रूरपणे मारहाण केल्याचा व्हिडिओ देखील समोर आला होता, त्यानंतर देश-विदेशातील लोकांनी त्याला जंगलात सोडण्यास सांगितले होते.

हे प्रकरण कोर्टातही गेले, जिथे त्याला वाचवण्यासाठी लढा दिला गेला. शेवटी 5 जून 2014 रोजी सुंदरला बन्नेरघट्टा बायोलॉजिकल पार्कमध्ये आणण्यात आले, जिथे त्याची काळजी घेण्यात आली. त्याच्यावर उपचार करण्यात आले. 2013 मध्ये 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'च्या (The Kapil Sharma Show) सेटवर आग लागल्यानंतर कपिलने तेथे उपस्थित असलेल्या पिल्लांचे प्राण वाचवले होते.

PETA

'जर्सी'च्या शूटिंगवेळी मृणाल ठाकूरला होती 'ही' भीती

पेटा इंडियाचे सचिन बंगेरा यांनी या बातमीची पुष्टी केल्यानंतर ट्विट केले होते. "कॉमेडी नाइट्स विथ कपिलच्या सेटवर कपिल शर्माने वाचवलेली ही पिल्ले आता सुरक्षित आहेत! त्या बाबतीत PETA कडून धन्यवाद." कपिलला 2015 मध्ये PETA च्या 'पर्सन ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com