पनवेलच्या फार्म हाऊसमध्ये सलमान खानला चावला साप

साप चावल्यानंतर सलमान खानला नवी मुंबईतील कामोठे परिसरातील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Bollywood actor Salman Khan was bitten by a snake

Bollywood actor Salman Khan was bitten by a snake

Dainik Gomantak

Published on
Updated on

बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानला साप चावला आहे. पनवेल येथील फार्महाऊसवर शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री सलमान खानला साप चावला. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानला बिनविषारी साप चावला आहे, त्यामुळे दबंग खानवर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही, असे सांगण्यात येत आहे. साप चावल्यानंतर सलमान खानला नवी मुंबईतील कामोठे परिसरातील एमजीएम (महात्मा गांधी मिशन) रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारानंतर सलमान खान (Salman Khan) आज सकाळी 9 वाजता त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर परतला. सलमान खानची प्रकृती धोक्याबाहेर असून तो लवकरच बारा होईल. सध्या सलमान खानची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या सलमान खान त्याच्या फार्महाऊसवर आहे.

<div class="paragraphs"><p>Bollywood actor Salman Khan was bitten by a snake</p></div>
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने दिला '83'चा Review

27 डिसेंबरला सलमान खानचा वाढदिवस आहे

सलमान खान 56 वर्षांचा होणार आहे. 27 डिसेंबर रोजी तो आपला 56 वा वाढदिवस साजरा करणार आहे. कोरोनामुळे सलमान यावेळी फार जोरात वाढदिवस साजरा करणार नाहीये. रिपोर्टनुसार, यावेळी सलमानच्या वाढदिवसानिमित्त एक छोटीशी पार्टी होणार आहे. सलमान खान त्याचा वाढदिवस पनवेलच्या फार्महाऊसवर साजरा करणार आहे. कुटुंबातील सदस्य आणि काही खास मित्र या पार्टीत सहभागी होणार आहेत.

रिपोर्टनुसार, सलमानचा प्लॅन असा आहे की तो खूप लोकांना आमंत्रित करणार नाही, तो खूप साधा ठेवणार आहे. तसे, प्रत्येक वेळी सलमान खानच्या वाढदिवसाला पाहुण्यांची यादी खूप मोठी असते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सलमान आपला वाढदिवस शांततेत साजरा करणार आहे. लोकांचा जीव धोक्यात न टाकल्यामुळे तो अधिक लोकांना आमंत्रित करत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com