Pathaan Advance Booking: शाहरुख खानच्या 'पठाण'ला देशात जरी विरोध होत असला तरी परदेशात मात्र चित्रपटाचं जोरदार बुकींग सुरू आहे. भारतात पठाण चित्रपटाला जोरदार विरोध होत असताना इतर देशात पठाण अॅडव्हान्स बुकींगच्या बाबतीत 'पठाण'ने नवे नवे रेकॉर्ड रचत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जर्मनीमध्ये सगळे ओपनिंग शो हाऊसफुल झाले आहेत.तर दुसरीकडे कॅनडामध्ये जानेवारी महिन्यातली सगळी तिकीटं विकली गेली आहे.
Pathaan Advance Booking: शाहरुख खानच्या(Shah Rukh Khan) ‘पठाण‘ ने जर्मनीमध्ये रिकॉर्ड तोड अॅडव्हान्स बुकींग केलं आहे. चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते हे शाहरुख खानची ग्लोबल क्रेज असण्याचं लक्षण आहे. जगभरात 'पठाण'चं चांगलं स्वागत झालं आहे हेच यांतुन दिसतं. भारतातही पठाणची ओपनिंग चांगली होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
भारतात अॅडव्हान्स बुकींग सुरू झाले नसले तरी शाहरुख खान 4 वर्षांनी परतत असल्यामुळे पठाण भारतातही तगडी कमाई करेल यात शंका नाही.
मिळालेल्या माहितीनुसार जर्मनीत शाहरुख या नावाची जादु चालली आहे. कारण जर्मनीतले सगळे थिएटर्स पठाणच्या शोसाठी हाऊसफुल्ल असणार आहेत. कॅनडातही जानेवारी महिन्यातले सगळी तिकीटं विकली गेली असल्याची माहिती मिळाली आहे.
या सगळ्या बातम्यांवरुन शाहरुख नावाची जादू चालली आहे असंच म्हणाव लागेल. कारण पठाणला गेल्या काही दिवसात प्रचंड विरोधाला सामोरं जावं लागलं आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.