Vijay-Tamannaah: विजय वर्मा आणि तमन्ना भाटियाचा गोव्यात रोमान्स...

अभिनेता विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांचा रोमान्स गोव्यात पाहायला मिळाला आहे.
Tamanna 
Vijay Bhatia
Tamanna Vijay BhatiaDainik Gomantak

बॉलिवूडमध्ये डेटिंग आणि ब्रेक-अप या गोष्टी ठरलेल्या असतात. बऱ्याचदा या सर्व गोष्टा ऐकी वाटतात किंवा निव्वळ गॉसिप्स वाटतात ;पण कित्येकदा ज्यांच्याबद्दल चर्चा होते असे लव्ह बर्ड्स कॅमेऱ्यात कैद होतात आणि मग चर्चांना उधाण येतं.

आता गोव्यातून अशा चर्चांना उधाण येणार आहे. आणि या चर्चांना हवा देणारं कपल नुकतंच गोव्याच्या मदमस्त वातावरणात धुंद झालेलं दिसलं. हे कपल आहे साऊथची सुंदरी तमन्ना(Tamanna) भाटिया आणि आपल्या वेगळ्या अभिनय शैलीने ओळख निर्माण करणारा विजय वर्मा(vijay Varma).

प्रेम कितीही लपवलं तरी ते लपत नाही. त्यात जर हे प्रेम सेलिब्रिटींचं असेल तर मग काहीही करुन लोक त्यांच्या नात्याबद्दल माहिती मिळवतातच. सगळं जग नव्या वर्षाचं स्वागत करत असताना गोव्याच्या रम्य वातावरणात तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा एकमेकांच्या बाहुपाशात रमले होते.

या नव्या नव्या कपलने गोव्यात आपला क्वालिटी टाईम घालवण्याचा विचार केला होता ;पण इथंही फॅन्सने त्यांचा पाठलाग सोडला नाही. दोघांच्या रोमान्सचे क्षण आपल्या कॅमेऱ्यात साठवण्याचा मोह काही लोकांना आवरला नाही.

Tamanna 
Vijay Bhatia
Anupam Kher in IFFI : कलाकाराला स्वत:वर विनोद करता आला, तरच तो उत्तम अभिनेता..!

विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया एकमेकांच्या मिठीत विसावुन नवीन वर्ष साजरं करत होते. सोशल मिडियावर हे कपल म्हणजे नक्की विजय आणि तमन्नाच आहेत की आणखी कुणी असा प्रश्न पडला होता इतक्यात एका युजरने दोघांचा एक स्पष्ट फोटो पोस्ट केला आणि या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाले.
तमन्ना आणि विजय पहिल्यांदा एकत्र दिसले नव्हते यापूर्वीही दलजीत डोसांजच्या कॉन्सर्टमध्ये दोघे एकत्र नाचले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com