Tu Jhoothi Main Makkaar Box Office Collection: रणबीर-श्रद्धाच्या ‘तू झुठी मैं मक्कार’ने पार केला 100 कोटींचा टप्पा...

रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचा रोमँटिक चित्रपट ‘तू झुठी मैं मक्कार’ने बॉक्स ऑफिसवर चांगलीच जादु केली आहे.
Ranbir Kapoor & Shradha Kapoor in Tu Jhoothi Mai Makkar
Ranbir Kapoor & Shradha Kapoor in Tu Jhoothi Mai MakkarDainik Gomantak
Published on
Updated on

Tu Jhoothi Main Makkaar Box Office Collection: बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर आणि प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचा रोमँटिक चित्रपट ‘तू झुठी मैं मक्कार’ने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.

त्यांच्या या चित्रपटाला चाहत्यांनी प्रचंड पसंती दिली आहे. ‘तू झुठी मैं मक्कार’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. 11 दिवसांत या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा गाठला आहे.

‘तू झुठी मैं मक्कार’ हा रणबीर कपूरच्या करिअरमधील सहावा हिट चित्रपट ठरला आहे. यापुर्वी 2022 मध्ये रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट रिलीज झाला होता.

या चित्रपटाने (Movie) 200 कोटींहून अधिकची कमाई केली होती. याशिवाय रणबीरच्या ‘बर्फी’, ‘संजू’, ‘ये जवानी है दिवानी’ आणि ‘ये दिल है मुश्किल’ या चित्रपटांनीही 100 कोटींहून अधिक कमाई केली होती.

Ranbir Kapoor & Shradha Kapoor in Tu Jhoothi Mai Makkar
Malaika Arora: अरबाज ना अर्जुन, मलायका नक्की मिस करतेय कोणाला? इन्स्टाग्राम पोस्टमुळे खळबळ

श्रद्धा आणि रणबीरचा चित्रपट 'तू झुठी मैं मक्कार'च्या एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शनने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातही दमदार कमाई केली आहे.

शुक्रवारी या चित्रपटाने 3.50 कोटींचा बिझनेस केला. या चित्रपटाने दुसऱ्या शनिवारी 6 कोटी रुपये कमावले आहेत. गेल्या तीन दिवसांच्या तुलनेत चित्रपटाचे शनिवारचे कलेक्शन चांगले होते. या चित्रपटाने आतापर्यंत एकूण 102.21 कोटींची कमाई केली आहे.


‘तू झुठी मैं मक्कर' चे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे. रणबीर आणि श्रद्धा यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे. दोघांच्या चाहत्यांसाठी ही एक पर्वणीच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com