Actress Ruchismita Guru: इंडस्ट्रीला झालंय काय? आता या अभिनेत्रीचा मृतदेह सापडला नातेवाईकाच्या घरी...

दोनच दिवसांपूर्वी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्येचा धक्का इंडस्ट्री पचवत होती की अचानक आता या उडिया अभिनेत्रीचा धक्कादायक मृत्यू झाला आहे
Actress Ruchismita Guru Suicide
Actress Ruchismita Guru SuicideDainik Gomantak
Published on
Updated on

Actress Ruchismita Guru Takes Her Own Life: भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्येची बातमी ताजी असताना आता अजुन एक धक्कादायक बातमी इंडस्ट्रीतून समोर आली आहे. 

उडिया अभिनेत्री-गायिका रुचिस्मिता गुरु हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री रुचिस्मिता गुरु तिच्या नातेवाईकाच्या घरी मृतावस्थेत आढळून आली आहे.

ऋचिस्मिता सुदापाडा येथे मामाच्या घरी राहात होती.ऋचीस्मिता गुरूने अनेक अल्बममध्ये काम केले आहे. अभिनयासोबतच ती एक गायिकाही होती. ऋचीस्मिता गुरूने अनेक स्टेज शोमध्ये परफॉर्म केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार तिचे शव खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळले. माहिती मिळताच बलांगीर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले.

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी भीमा भोई वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठवला. दरम्यान, ऋचीस्मिताच्या आईने सांगितले की, बटाट्याचा पराठा बनवण्यावरून तिचा मुलीसोबत वाद झाला.

ऋचीस्मिताच्या आईने सांगितले की, मी तिला रात्री आठ वाजता बटाट्याचा पराठा बनवायला सांगितला, पण तिने रात्री दहा वाजता बनवणार असल्याचे सांगितले. यावरून आमच्यात भांडण झाले.

रुचीस्मिताने यापूर्वीही अनेकवेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. सध्या पोलीस या अभिनेत्रीच्या मृत्यूचे कारण शोधण्यात गुंतले आहेत. पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. 

Actress Ruchismita Guru Suicide
Rani Mukerji on Mardani 3: राणी मुखर्जी पुन्हा परतणार पोलीस दलात...या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच...

ऋचीस्मिताने यापूर्वीही अनेकवेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. सध्या पोलीस या अभिनेत्रीच्या मृत्यूचे कारण शोधण्यात गुंतले आहेत.

पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. सध्या पोलीस या अभिनेत्रीच्या मृत्यूचे कारण शोधण्यात गुंतले आहेत. पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com