Aamir Khan
Aamir Khan Dainik Gomantak

Aamir Khan : आमिर खानला आता केजीएफच्या दिग्दर्शकाचा आधार..पुढचा चित्रपट सोबत करणार

अभिनेता आमिर खान आता केजीएफच्या दिग्दर्शकासोबत काम करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Published on

आमिर खानचा लाल सिंह चढ्ढा 2022 सालचा फ्लॉप चित्रपट ठरला. आमिर खानने तब्बल 4 वर्षांनी कमबॅक केले होते, त्यामुळे साहजिकच त्याच्या या चित्रपटाकडुन मोठ्या अपेक्षा होत्या ;पण बॉयकॉट ट्रेंडमुळे त्याचा अपेक्षाभंग झाला. त्यामुळे आमिरचा एक महत्त्वाचा चित्रपट त्याच्या अपेक्षेप्रमाणे लोकांच्या भेटीला येऊ शकला नाही.

आमिरसारख्या कलाकारासाठी हा एक मोठा धक्का होताच त्यामुळे साहजिकच आमिर त्याच्या नव्या प्रोजेक्टसाठी अत्यंत गंभीर असणार आहे हे नक्की. आता आमिर खान साऊथच्या एका दिग्दर्शकासोबत काम करणार असल्याची बातमी समोर आली आहे.

खरंतर आमिरने नोव्हेंबर मध्ये आपण कामातुन निवृत्ती घेणार असल्याचं सांगितलं होतं पण बहुतेक केजीएफचे दिग्दर्शक प्रशांत नील यांना मात्र आमिर खानला अभिनय करतानाच बघायचं आहे. कारण प्रशांत नीलच्या पुढच्या चित्रपटात आमिर खान ज्युनिअर एनटीआर सोबत असल्याची शक्यता आहे. या चित्रपटाची घोषणा मे महिन्यातच झाली होती.

Aamir Khan
Sidharth Malhotra-Kiara Advani: ठरलं! सिद्धार्थ-कियारा 'या' ठिकाणी घेणार सात फेरे...

दिग्दर्शक प्रशांत नीलच्या जवळच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या नव्या चित्रपटांत ज्युनिअर एनटीआर सोबत आमिर खान दिसणार आहे. सध्या दिग्दर्शक प्रशांत नील त्याच्या आगामी 'सालार' चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे.

हा चित्रपट झाल्यावर तो आमिर खान आणि ज्युनिअर एनटीआर यांच्यासोबत नव्या चित्रपटात बिझी असणार आहे. या चित्रपटांत आमिर खान व्हिलनच्या भूमीकेत असणार आहे अशीही माहिती मिळाली आहे. हा नवा चित्रपट आमिरसाठी एक टर्निंग पॉईंट ठरतोय की नाही हा उत्सुकतेचा विषय असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com