Nora Fatehi Viral Video : हाय गर्मी! गोव्यात भर रस्त्यात नोराचा हॉट डान्स, ट्रॅफीक झालं जॅम; पाहा व्हिडीओ

अभिनेत्री नोरा फतेहीचा पणजीच्या रस्त्यावरचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
Nora Fatehi Viral Video
Nora Fatehi Viral VideoDainik Gomantak

मनोरंजन क्षेत्रातल्या एखाद्या सेलिब्रिटीला शिंक जरी आली तरी फॅन्समध्ये चर्चेला उधाण येतं. सध्या सोशल मिडियाच्या सहजतेमुळे कुठलीही गोष्ट सहजपणे व्हायरल होते. आता पणजीतल्या या व्हायरल व्हिडीओचंच पाहा. बॉलिवूडची ग्रेट डान्सर नोरा फतेहीचा हा व्हायरल व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

अभिनेत्री नोरा फतेही एक उत्तम डान्सर म्हणून ओळखली जाते. बेली डान्स या स्टाईलमध्ये तिच्याइतकी चांगली परफॉर्मर बॉलिवूडमध्ये शोधून सापडणार नाही. सध्या सोशल मिडीयावर नोराची चांगलीच चर्चा सुरू आहे. त्याचं कारण म्हणजे नोराचा पणजीतला हा व्हायरल व्हिडीओ.

नोराला दिलबर गर्ल म्हणुनच तिचे फॅन्स ओळखतात. तिच्या सौंदर्यासोबतच फॅन्स तिच्या फिटनेस आणि डान्सचेही दिवाने आहेत. नोराच्या पणजीतल्या या व्हिडीओने तिच्या फॅन्सच्या काळजाचा ठोका चुकवला असला तरी तिच्या या स्ट्रीट डान्समुळे रस्ता ब्लॉक झाला होता आणि तिथल्या रहिवाशांनाही चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला आहे.

अलीकडेच, एका मोरोक्कन सोशल मीडिया एजन्सीने सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो केलेल्या मोरोक्कन स्टार्सची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे बी-टाऊनची डान्सिंग दिवा नोरा फतेही या यादीत टॉपवर आहे. 

नोरा सोशल मीडियावरील सर्वात प्रतिष्ठित स्टार्सपैकी एक आहे. नोराचे सोशल मीडियावर सुमारे 44.9 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. अभिनेत्री नेहमीच तिच्या सौंदर्याने, अप्रतिम नृत्यशैलीने आणि आकर्षक व्यक्तिमत्वाने प्रभावित होण्याची कोणतीही संधी सोडत नाही.

Nora Fatehi Viral Video
Rahul Gandhi Karnataka Result: 'द्वेषाचा बाजार बंद, प्रेमाचे दुकान सुरु...', कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयानंतर राहुल गांधींची प्रतिक्रीया

नोरा एक अष्टपैलू अभिनेत्री आहे. उत्तम डान्सर असण्यासोबतच त्याने चित्रपटांमध्येही आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. नोराने एका रिअॅलिटी शोमध्ये जजची भूमिकाही साकारली आहे. इतकेच नाही तर नोराने 'झलक दिखला जा 9' आणि 'बिग बॉस 9' या रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला होता. नोरा फतेहीने 'साकी साकी', 'नच मेरी रानी', 'एक तो काम जिंदगानी' सारख्या आयटम साँगसह अनेक अप्रतिम डान्स नंबरही केले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com