Shilpa Shetty
Shilpa Shetty Dainik Gomantak

'Nirbhaya Pathak' honored by Shilpa Shetty : महिलांसाठी झटणाऱ्या निर्भया पथकाचा या अभिनेत्रीने केला सन्मान

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने महिलांच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या निर्भया पथकाचा सन्मान केला आहे
Published on

'Nirbhaya Pathak' Honored by Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टी अभिनयासोबतच तिच्या फिटनेसमुळे ओळखली जाते. आता शिल्पा एका कारणाने चर्चेत आली आहे आणि ती म्हणजे महिलांची सुरक्षा करणाऱ्या निर्भया पथकाचा सन्मान केल्यामुळे.

महिलांच्या सुरक्षेसाठी अथकपणे काम करणाऱ्या निर्भया पथकातील महिला अधिकाऱ्यांचा शिल्पा शेट्टी कुंद्राने सत्कार केला आहे.

महिला दिनानिमित्त मुंबई पोलिसांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी शिल्पा म्हणाली “निर्भया पथकाचे निर्भय पोलीस शहराला सुरक्षितपणे झोपावे यासाठी चोवीस तास अथक परिश्रम घेतात. 

त्यांच्या कामगिरीसाठी त्यांचा सत्कार करताना मला अभिमान वाटतो,” शिल्पाने जगभरातील महिलांना कलंक, आघात, अत्याचार आणि महिलांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करताना येणाऱ्या सर्व अडथळ्यांविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन करणारी पोस्ट शेअर केली. 

वर्क फ्रंटवर, शेट्टी रोहित शेट्टीच्या पुढील प्रोजेक्ट, इंडियन पोलिस फोर्समध्ये महिला पोलिसाच्या भूमिकेसाठी तयार आहे.

Shilpa Shetty
Kangana Ranaut supports Nawaz: "तुम्ही बोललात बरं झालं शांतता प्रत्येकवेळी ठीक नसते"! नवाजुद्दीनसाठी कंगना मैदानात

अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही तिच्या अभिनयासाठी आणि फिटनेससाठी ओळखली जातेच ;पण तिच्या या कृतीने तिने सर्वांची मनं जिंकली आहेत.

निर्भया पथकाचा सन्मान करून तिने आपल्याला सामाजिक भान असल्याचे दाखवून दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com