Manoj Muntashir
Manoj MuntashirTwitter

National Film Awards : मनोज मुंतशीर सर्वोत्कृष्ट गीतकार; पण पुरस्कार कार्यक्रमांवर टाकला होता बहिष्कार

प्रसिद्ध लेखक मनोज मुंतशीरला (Manoj Muntashir) 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळाला आहे.
Published on

National Film Awards 2022: प्रसिद्ध लेखक मनोज मुंतशीरला (Manoj Muntashir) 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळाला आहे. दोन वर्षांपूर्वी मनोजने सर्व अवॉर्ड शोवर बहिष्कार टाकला होता आणि आता कोणत्याही अवॉर्ड शोमध्ये सहभागी होणार नाही अशी शपथ घेतली होती. (Manoj Muntashir why boycotted award show)

दोन वर्षांपूर्वी गुवाहाटी येथे झालेल्या 65व्या फिल्मफेअर पुरस्काराची गोष्ट आहे, जेव्हा गली बॉय चित्रपटातील 'अपना टाइम आएगा' या गाण्याला फिल्मफेअर मिळाला होता. या पुरस्काराच्या शर्यतीत मनोज मुंतशीर यांनी लिहिलेले 'तेरी मिट्टी...' हे गाणेही समाविष्ट होते. या गाण्याला सन्मान मिळत नसल्याने मनोजला खूप राग आला आणि त्याने सोशल मीडियावर लिहिले की, यापुढे तो कोणत्याही अवॉर्ड शोचा भाग होणार नाही.

Manoj Muntashir
National Film Awards: 'गोष्ट एका पैठणीची' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, राहुल देशपांडे उत्कृष्ट पार्श्वगायक

ही दोन गाणी लोकांसमोर ठेवली तरी चालेल, असं मनोज म्हणाला होता. माझे 'तेरी मिट्टी...' हे गाणे या देशातील सुमारे 40 लाख लष्करी आणि निमलष्करी दलांचे प्रतिनिधित्व करते. हे देशभक्तीचे आहे आणि या गाण्याची तुलना 'तू नंगा ही तो आया है, घंटा लेकर जाएगा' या गाण्याशी करण्यात आली, जे चुकीचे आहे.

Manoj Muntashir
National Film Awards संपुर्ण यादी: अजय देवगण, सुर्या सर्वोत्कृष्ट अभिनेते, तान्हाजी सर्वोत्कृष्ट चित्रपट

मनोज म्हणाला होता की, 'सिनेमा हा एक पडदा आहे, त्याचा मुखवटा कधीही उघडता कामा नये. अशी मूर्ख गाणी बनवू नयेत. ती बनवली तरी फिल्मफेअर सारख्या पुरस्कारासाठी त्याला नामांकित केले आणि त्याला पुरस्कार दिला तरी मला काही फरक पडत नाही. मात्र यामुळे जनतेला मोठा फटका बसला आहे. हिंदुस्थान जो एवढा मोठा देश आहे, ज्यांना त्यातील संगीत समजते. ज्यांना संगीताची जाण आहे त्यांचे हृदय नक्कीच या गाण्यावर प्रश्न उपस्थित करतील.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com