National Film Awards 2020 : दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये आज 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा होत आहे. हे सर्व पुरस्कार २०२० सालातील आहेत. या पुरस्काराच्या यादीमध्ये तानाजी : द अनसंग वॉरियर या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. मराठीबाबत सांगायचे झाल्यास 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय मी वसंतराव या चित्रपटातील पार्श्वगायनांसाठी राहुल देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा पुरस्कार मिळाला आहे.
चित्रपटांसाठी सर्वाधिक पसंती मिळालेल्या राज्याचा पुरस्कार मध्य प्रदेशला मिळाला आहे. तर यावेळी सर्वोत्कृष्ट समीक्षकाचा पुरस्कार कोणालाही देण्यात आलेला नाही. 'द लॉगेंस्ट किस' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला आहे. विशाल भारद्वाज यांना नॉन फीचर फिल्मसाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे. आज घोषणेपूर्वी, ज्युरी सदस्यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली आणि त्यांना अहवाल सादर केला. केंद्रीय मंत्र्यांनी ज्युरी सदस्यांच्या कार्याचे कौतुक केले.
दरम्यान मराठी चित्रपट सृष्टिसाठी सन्मानाची बाब म्हणजे, उत्कृष्ठ मराठी सिनेमा म्हणून, 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रटाचा सन्मान झाला आहे. त्याचबरोबर मी वसंतराव या चित्रपटातील गीतासाठी उत्कृष्ट पार्श्वगायक राहुल देशपांडे यांना सन्मानित करण्यात आले आहे.
विशेष उल्लेखनीय फिचर फिल्म
जून (मराठी)
अभिनेता- सिदार्थ मेनन
गोदाकाठ (मराठी)
अवांचित (मराठी)
अभिनेता- किशोर कदम
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट
तानाजी : द अनसंग वॉरियर
निर्माता- अजय देवगण
दिग्दर्शक- ओम राऊत
सर्वोत्कृष्ट अभिनेता - अजय देवगण (तान्हाजी: द अनसंग वॉरियर) आणि सुर्या (सूराराई पोत्रू)
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - तुलसीदास ज्युनियर (आशुतोष गोवारीकर)
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट - तान्हाजी: द अनसंग वॉरियर
बेस्ट फीचर फिल्म- सोरारई पोटरू (तमिल)
बेस्ट एक्ट्रेस- अपर्णा बालमुरली (सोरारई पोटरू)
बेस्ट गीतकार- मनोज मुन्तशिर (सायना)
बेस्ट बुक ऑन सिनेमा- द लॉन्गेस्ट किस- किश्वर देसाई या पुस्तकाचे लेखक आहेत.
बेस्ट नरेशन 'वॉयस ओवर' अवॉर्ड- शोभा थरूर श्रीनिवासन यांना 'रैप्सोडी ऑफ रेन- मॉनसून ऑफ केरल' या चित्रपटासाठी हा पुरस्कार देण्यात आला.
बेस्ट म्यूजिक डायरेक्शन- विशाल भारद्वाज (1232 किलोमीटर)
बेस्ट फिल्म ऑन फैमिली वैल्यूज- अभिजीत दलवी
मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेट- मध्य प्रदेश
मोस्ट फिल्म फ्रेंडली (विशेष उल्लेख)- उत्तराखंड आणि यूपी
बेस्ट फिल्म ऑन सोशल इस्यू- जस्टिस डिलेड बट डिलिवर्ड आणि थ्री सिस्टर्सला देण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.