Plus-size Influencer Dances to Besharam Rang
Plus-size Influencer Dances to Besharam RangDainik Gomantak

Besharam Rang : बेशरम गाण्यावर प्लस साईज मॉडेलचा डान्स, दीपिकाही झाली दिवानी

तन्वी गीता रविशंकर या सोशल मिडीया इन्फ्लूएन्सरने 'बेशरम रंग' या गाण्यावर डान्स केला आहे.
Published on

Plus-size Influencer Dances to Besharam Rang : 'बेशरम रंग' या पठाण चित्रपटाच्या गाण्यावरचे वाद गेले काही दिवस सुरू आहेत. या गाण्यात 'दीपिका पदुकोण'ने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकीनीवरुन मोठाच वाद निर्माण झाला होता.

हा वाद इतका भडकला कि शाहरुखसह पठाण चित्रपटाच्या 5 जणांवर बिहारमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. या गाण्यातुन निर्माण झालेल्या वादाचे पडसाद देशभर उमटले.

अभिनेत्री आणि मॉडेल ऊर्फी जावेद हिने तर काल बेशरम गाण्यावर भगवे कपडे घालुन एक व्हिडीओ बनवला होता, इन्स्टाग्रामवर तिने तो व्हिडीओ पोस्ट करताच काही युजरकडुन विरोधाच्या प्रतिक्रिया सुद्धा आल्या.

आता या गाण्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर तन्वी गीता रविशंकर हिने या गाण्यावर डान्स केल्यामुळे सोशल मिडियावर आता प्रतिक्रियांना उधाण आलं आहे.हा व्हिडीओ तन्वीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअरही केला आहे. बोल्ड कपड्यांसह तिने केलेला हा डान्स कित्येकांना आवडला.

तन्वी गीता रविशंकरचे इंस्टाग्रामवर 153 K म्हणजेच दिड लाखांहुन आधिक फॉलोवर्स आहेत.आपल्या खुल्या अंदाजातला तिचा हा व्हिडीओ पठाणचं प्रमोशन करतोय.

Plus-size Influencer Dances to Besharam Rang
Kunal Kamra: विमानातलं सहप्रवाशाचं गैरवर्तन प्रकरण, कुणाल म्हणाला अर्णबने तर चड्डीतच...

'बेशर्म रंग' या गाण्यावर तन्वीने या गाण्याच्या स्टेप्स रिक्रियेट केल्या आहेत. या व्हिडीओत तन्वीने पर्पल कलरची बिकीनी घातली आहे. समुद्राच्या किनाऱ्यावर तिने हा व्हिडीओ शुट केला आहे. बेशर्म रंग वर केलेला हा व्हिडीओ शेअर करताना तन्वी म्हणते

जर तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टी आवडत असतील, जे कपडे तुम्हाला आवडतात ते कपडे तुम्ही घालत आहात, आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने आणि जर तुम्ही जगत असाल आणि जर लोकांच्या नजरेत तुम्ही बेशरम वाटत असाल तर त्यात काहीच चुकीचं नाही.

2023 साल आलं आहे आणि सगळीकडे तुम्हाला बेशरम लोकच दिसतील. प्रचंड वजनदार असुनही तिने हा डान्स केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत.

या व्हिडीओला आतापर्यंत 74 हजार लोकांनी लाईक केलं आहे. इतकंच नाही तर दिपीका पदुकोणने हा व्हिडीओ लाईक केला आहे. या व्हिडीओला कित्येक लोकांच्या चांगल्या प्रतिक्रिया आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com