Kumar Kamara
Kumar KamaraDainik Gomantak

Kunal Kamra: विमानातलं सहप्रवाशाचं गैरवर्तन प्रकरण, कुणाल म्हणाला अर्णबने तर चड्डीतच...

विमानातील सहप्रवाशाच्या वर्तनावर शिक्षेचा निर्णय दिला असताना कुणाल कामराने एक मनोरंजक ट्वीट केलं आहे.

Air India Urination incident : विमान प्रवासात शक्यतो सभ्यतेवर प्रश्नचिह्न निर्माण होईल असं वर्तन प्रवाशांकडुन होत नाही. पण असा एक प्रकार आता समोर आला आहे.  एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइटदरम्यान एका प्रवाशाकडून एका वृध्द महिला प्रवाशावर लघवी केल्याचा प्रकार घडला. या लघवी करणाऱ्या प्रवाशावर एअर इंडियाकडून ३० दिवसांची बंदी घालण्यात आली आहे. हा प्रकार समोर येताच स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने या शिक्षेची खिल्ली उडवणारं ट्विट केलं आहे.

कुणाल कामरा आणि अर्नव गोस्वामी यांच्यात विमान प्रवासादरम्यान वाद झाला होता. यामुळे अनेक विमान कंपन्यानी त्याच्यावर बंदी घातली होती. त्या घटनेचा संदर्भ देत कुणाल कामराने टीएमसीच्या नेत्या महुआ मोइत्रा यांच्या ट्विटला उत्तर देताना विमान कंपन्यांना खोचक टोला लगावला आहे.

एअर इंडिया एअरलाइन्सने नोव्हेंबर 2022 मध्ये न्यूयॉर्क ते दिल्ली या फ्लाइटमध्ये प्रवास करणाऱ्या वृद्ध महिलेवर लघवी केल्याचा आरोप करणाऱ्या पुरुषावर 30 दिवसांची बंदी घातली आहे. त्यांच्या अधिकृत निवेदनात, एअरलाइन्सने म्हटले आहे की त्यांनी या घटनेची अतिशय गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांनी देखील या ट्विट केलं

तृणमूल काँग्रेसचे खासदार महुआ मोईत्रा यांनी नागरी विमान वाहतूक नियामक संस्थेच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

त्यांनी ट्विट केले, "@DGCAIndia (नागरी विमान वाहतूक महासंचालनालय) च्या कामाबाबत मी संभ्रमात आहे, सह-प्रवाशाला प्रश्न विचारला म्हणुन कुणाल कामरावर 6 महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती, परंतु एअर इंडीया विमानात सह-प्रवाशावर लघवी करणाऱ्या एका व्यक्तीवर 30 दिवस बंदी घालण्यात आली .कुणाल… पुढच्या वेळी तुझी पद्धत बदल..

Kumar Kamara
Yogi Adityanath in Mumbai : योगी आदित्यनाथ बॉलिवूड 'यूपी'ला नेणार? म्हणाले...

महुआ मोईत्रा यांच्या ट्विटला कामराने उत्तर दिले आहे. कामरा म्हणाला माझ्यावर सहा महिन्यांची बंदी घालण्यात आली जी ३ महिने कमी करण्यात आली कारण अर्णबने चड्डीतच *** . त्याने ट्विट केलं आहे की, "मला 6 महिने मिळाले जे कमी करून 3 महिने झाले कारण अर्णब त्याच्या पँटमध्ये *** होता"

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com