Actress Rati Pandey spoken about the abusive treatment she received on the set : 'मिले जब हम तुम' आणि 'हिटलर दीदी' मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री रती पांडेची तिच्या आयुष्यातील एका कटू प्रसंगाची आठवण सांगितली आहे.
सेटवर झालेल्या अपमानामुळे रती तिचा आत्मविश्वास कला हरवून बसली होती. यावर आता रती मोकळेपणाने बोलली आहे.
'ईटाईम्सला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रतीने एकेकाळी सहन केलेल्या अपमानास्पद प्रसंगाविषयी सांगितलं आहे. रती (Rati Pandey) म्हणाली, 'मला त्या शोचे नाव घ्यायला आवडणार नाही. तो एक पौराणिक शो होता".
वास्तविक, मी एक पौराणिक शो आणि एक ऐतिहासिक शो केला आहे. असं होतं की जेव्हा तुम्ही एखादा पौराणिक पात्राची भूमीका बराच काळ करत असता तेव्हा तुम्ही ते पात्र जगायला लागता".
रती पुढे म्हणाली "मी नेहमीप्रमाणे दैनंदिन जीवनात शुद्ध हिंदीत बोलू लागले. मी त्या पात्रातून बाहेर पडू शकलेच नाही. अचानक मला एका सोशल ड्रामाची ऑफर आली. आणि त्याची तयारी करायला मला वेळ मिळाला नाही. आठवड्याभरात शूटिंग सुरू झाले. मी शुद्ध हिंदीत बोलणे थांबवू शकले नाही".
रती पांडे पुढे म्हणाली, 'त्या शोच्या दिग्दर्शकाला त्या भूमिकेसाठी दुसरे कोणीतरी हवे होते. मात्र कोणीच सापडले नाही.
आपल्या आवडत्या अभिनेत्रीने या शोमध्ये सहभागी व्हायला हवे होते, असे त्याला वाटले. माझ्या मालिकेत असण्याला त्याचा विरोध होता. पण मी चॅनल आणि प्रॉडक्शन हाऊसचा फेव्हरेट होतो आणि मी ही भूमिका चांगल्या प्रकारे करू शकेन हे त्यांना माहीत होतं.
मी पहिल्यांदाच याबद्दल बोलत आहे. आणि हे माझ्यासोबत दोन-तीन वर्षांपूर्वीच घडलं होतं. तो संपूर्ण टीमसमोर माईकवर माझ्यावर ओरडू लागला. माझा अपमान करू लागला.
रती पांडे पुढे म्हणाली की तिला तिच्या क्षमतेवर शंका येऊ लागली होती. रात्री त्याला झोप येत नव्हती. 'जेव्हा मी संवाद बोलायचे तेव्हा तो मला अडवायचा आणि म्हणायचा 'तुला काम नीट जमत नाही'.
मुलाखतीत बोलताना रती पुढे म्हणाली "त्यांनी मला कधीही बोलू दिले नाही किंवा परफॉर्म करू दिले नाही.
तुमचा दिग्दर्शक हा शोचा कॅप्टन असतो आणि जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीला वेळ देता तेव्हा तो असे वागतो. एक अभिनेत्री म्हणून मला स्वतःवर संशय येऊ लागला.
मी घरी जाऊन विचार करू लागले.माझी रात्रीची झोप उडाली होती. अभिनय विसरून गेल्यासारखं वाटत होतं. मला कसे वागायचे ते माहित नाही का"?
रती पांडे म्हणाली, 'मी स्वतःला हा प्रश्न विचारायची. मी खचावे म्हूणून तो असे करायचा. पण मी हार मानली नाही. मी त्याला कधीच उत्तर दिले नाही. मी स्वतः कामाला लागले. आणि एके दिवशी मी माझी पावले मागे घेतली.
माझा क्लोज-अप चालू होता. त्यावेळी एक इमोशनल सीन चालू होता. त्याच क्षणी तो कट म्हणाला.
मग मी स्क्रिप्ट बाजूला ठेवली आणि म्हटलं की मी हा शो करत नाहीये. तुम्ही तुमची अभिनेत्री घेऊ शकता. मी माझ्या प्रोड्युसरला फोन केला आणि थँक्यू म्हणाले आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला.