Sonu Sood Viral Video: गुटखा फेकून दे! टी-स्टॉलवर सोनू सूद पोहोचताच...

Sonu Sood Viral Video: बॉलिवूड स्टार सोनू सूद आता संपूर्ण देशाचा हिरो बनला आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Sonu Sood
Sonu Sood Dainik Gomantak

Sonu Sood Viral Video: बॉलिवूड स्टार सोनू सूद आता संपूर्ण देशाचा हिरो बनला आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. जो इतर कोणीही नाही तर सोनू सूदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, तो रात्रीच्या वेळी चहाच्या स्टॉलवर जाताना दिसत आहे. इतकंच नाही तर तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीला गुटखा खाताना पाहिल्यावर तो त्याला न खाण्याचा सल्लाही देतो. आता चाहत्यांनी या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

गुटखा का खाता?

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रात्री 10 वाजण्याच्या सुमारास चंद्रपूरहून नागपूरला जाताना एका चहाच्या स्टॉलवर सोनू सूद (Sonu Sood) थांबतो. यानंतर, त्याने दुकानदाराला त्याचे नाव विचारले, तेव्हा त्याने त्याचे नाव अक्षय असल्याचे सांगितले. त्याचवेळी जवळच उभा असलेला अक्षयचा मित्र काहीतरी चघळताना दिसतो, तेव्हा सून त्याला विचारतो - 'तू गुटखा का खातोस, जा फेकून दे'. यानंतर तो सोनूचे ऐकते. त्याचबरोबर सोनूने त्याला कधीही गुटखा न खाण्याचा सल्ला दिला. तुम्ही पण हा पूर्ण व्हिडिओ पाहा...

Sonu Sood
Sonu Sood: सोनू सूदने मागितली रेल्वेची माफी, वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण...

गरिबांचा मसिहा

आपल्या सर्वांना माहित आहे की, कोविड-19 च्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये सोनू सूदने गरीब मजुरांना खूप मदत केली. यानंतर तो गरिबांचा मसिहा बनला. सोनू रोज कोणाला ना कोणाला मदत करताना दिसतो. इतकेच नाही तर काही लोकांनी त्याला देवासारखे पुजायला सुरुवात केली आहे. बरं, या व्हिडिओवरही लोक खूप प्रेमाचा वर्षाव करत आहेत. सोनूच्या या व्हिडिओला आतापर्यंत सुमारे 4 लाख लाईक्स आले आहेत.

त्याचवेळी, सोनूच्या व्हिडिओवर मजेशीर कमेंट करताना एका चाहत्याने म्हटले- 'तुम्ही गुटखा खाण्यास नकार देत आहात. अशा प्रकारे अजय देवगणचे नुकसान होईल. याशिवाय अनेक यूजर्सनी सोनूचे कौतुक करताना अनेक गोष्टी लिहिल्या आहेत.

Sonu Sood
Sonu Sood साठी कुटुंब महत्त्वाचे, आई-वडीलांकडून मिळाले समाजसेवचे संस्कार

याशिवाय, सोनू सूदच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, लवकरच दिग्दर्शक अभिनंदन गुप्ता यांच्या 'फतेह' चित्रपटात (Movie) दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी जुलैमध्ये प्रदर्शित होऊ शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com