Sonu Sood: सोनू सूदने मागितली रेल्वेची माफी, वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण...

रेल्वेने शेअर केला ट्विटरवरून व्हिडिओ, सोनुने दिले प्रत्युत्तर
Income tax surveyed on 6 locations of Sonu Sood
Income tax surveyed on 6 locations of Sonu Sood Dainik Gomantak

Sonu Sood: अभिनेता सोनू सूद कोरोना महामारीच्या काळात स्थलांतरीत कामगारांचा मसिहा म्हणून समोर आला होता. तेव्हा सोनुने अनेकांना मदत केली होती. अनेक लोकांना, विशेषत: गरीबांना घरी परत पाठवण्यासाठी सहकार्य केले होते. पण नुकतेच सोनुने एका चुकीसाठी रेल्वे विभागाची माफी मागितली आहे.

Income tax surveyed on 6 locations of Sonu Sood
Covid-19: देशात पुन्हा होणार लॉकडाऊन लागू; सरकारने दिली 'ही' मोठी माहिती

13 डिसेंबर 2022 रोजी सोनू सूदने त्याच्या ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला. यामध्ये तो ट्रेनच्या दारात बसून प्रवास करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ट्रेन एका प्लॅटफॉर्मवरून जाताना दिसत आहे. सोनूच्या या जुन्या व्हिडिओवर कमेंट करताना रेल्वेने ट्रेनच्या दरवाजावर बसून प्रवास न करण्याचा सल्ला दिला होता. ट्रेनच्या दारात बसून प्रवास केल्याबद्दल सोनू सूदने माफी मागितली आहे.

नॉर्थ रेल्वे विभागाने ट्विट केले होते की, "देशातील आणि जगातील लाखो लोकांसाठी तुम्ही एक आदर्श आहात. ट्रेनच्या पायऱ्यांवरून प्रवास करणे धोकादायक आहे, अशा प्रकारच्या व्हिडिओमुळे तुमच्या चाहत्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. कृपया असे करू नका! सुरक्षित प्रवासाचा आनंद घ्या."

Income tax surveyed on 6 locations of Sonu Sood
New Delhi: धक्कादायक! बसमध्ये मुलीसमोरच केले हस्तमैथुन, दिल्लीतील घटना

यानंतर गुरुवारी सोनू सूदने उत्तर रेल्वेची ट्विट करून माफी मागितली. सोनू सूदने लिहिले आहे की, "क्षमा प्रार्थी आहे. मी फक्त हे पाहण्यासाठी बसलो होतो, त्या लाखो गरीब लोकांना कसे वाटत असेल ज्यांचे आयुष्य अजूनही रेल्वेच्या दरवाज्यात बसून कंठावे लागत आहे. मला दिलेल्या या संदेशासाठी आणि देशातील रेल्वे व्यवस्था सुधारल्याबद्दल धन्यवाद."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com