HBD Manisha Koirala : 90 च्या दशकातलं प्रचंड फेम, दारुचं व्यसन आणि कॅन्सरशी झुंज, मनिषा झाली 53 वर्षांची...

अभिनेत्री मनिषा कोईराला 16 ऑगस्ट रोजी 53 वर्षांची झाली आहे. चला पाहुया आयुष्यातले चढ-उतार आणि मनिषाच्या करिअरचा प्रवास
HBD Manisha Koirala
HBD Manisha KoiralaDainik Gomantak
Published on
Updated on

मनिषा कोईराला...90 च्या दशकातल्या लाखो तरुणांच्या हृदयाचा ठोका चुकवणारी अभिनेत्री. दिल से चित्रपटातला शाहरुख सोबतचा तिचा रोमान्स कोण विसरेल? अभिनय आणि सौंदर्याचा संगम लाभलेली मनिषा आजही चाहत्यांच्या लक्षात आहे.

 16 ऑगस्ट 1970 रोजी काठमांडू, नेपाळमधील एका राजकीय कुटुंबात जन्मलेल्या मनीषा आज 53 वर्षांची झाली. मनीषाचा एक काळ होता ;पण फेम सोबत मनिषाने वाईट काळही पाहिला. 

सौदागर ते अकेले हम अकेले तुम तक

सौदागर ते अकेले हम अकेले तुम तक अशा अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करणाऱ्या मनीषाला प्रेक्षकांची पसंती होती, त्यानंतर दारूच्या व्यसनाने तिची कारकीर्द हिरावून घेतली. आज आम्ही तुम्हाला त्याचीच गोष्ट सांगणार आहोत.

राज कुमार आणि दिलीप कुमार

मनिषा कोईरालाने नेपाळी चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. हिंदी चित्रपटसृष्टीतने 'सौदागर' चित्रपटात पाऊल ठेवले. या चित्रपटात ती दिलीप कुमार आणि राजकुमार या दोन दिग्गज अभिनेत्यांसोबत दिसली होती. 

या चित्रपटात मनीषा आणि अभिनेता विवेक मुशरन यांची प्रेमकहाणी होती. चित्रपटातून मनीषाच्या निरागस चेहऱ्याने लोकांना वेड लागले. सौदागरपासून सुरुवात करून मनीषाने बॅक टू बॅक हिट्स दिले. तिला चाहत्यांचे भरभरून प्रेमही मिळाले.

फ्लॉप चित्रपट आणि दारुचं व्यसन

सततच्या यशानंतर तिच्या करिअरमध्ये एक वेळ अशी आली जेव्हा मनीषा कोईरालाचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले. तिला या तणावाचा सामना करता आला नाही, ज्यामुळे तिच्या करिअरवर परिणाम झाला. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मनीषा हळूहळू दारूच्या नशेत गेली आणि तिचे व्यसन कधी झाले हे तिला कळलेच नाही. 

दारूच्या व्यसनामुळे मनिषाला हळूहळू चित्रपट कमी मिळू लागले. इतकंच नाही तर 2 वर्षातच पतीसोबत भांडण आणि घटस्फोटामुळे ती पूर्णपणे तुटली. दारूच्या व्यसनाचा त्याच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला.

मनिषाचा कर्करोगाशी लढा...

मनीषाच्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्पा होता जेव्हा तिला तिच्या आजाराची माहिती मिळाली. ती गर्भाशयाच्या कर्करोगाने ग्रस्त होती ;पण कॅन्सरसमोर मनीषाने हार मानली नाही. 

मनिषा कॅन्सरशी लढली, ती आपल्या मूळ गावी काठमांडूनंतर मुंबईत आली आणि कर्करोगावर उपचार करून घेतले. ती बरीही झाली आणि आपले पूर्ववत आयुष्य जगू लागली. 

चार वर्षांच्या प्रदीर्घ उपचारानंतर मनीषा कोईराला यांनी कॅन्सरशी लढाई जिंकली. आज मनीषा कॅन्सर सर्व्हायव्हर आहे आणि तिने स्वतःला दारूच्या व्यसनापासून दूर ठेवले आहे.

HBD Manisha Koirala
The Vaccine War : प्रोपगंडा फिल्म कोण पाहणार? विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द वॅक्सिन वॉर'च्या टिजरवर यूजर्स नाराज ....

मनिषा राजघराण्यातून

अभिनय कारकिर्दीव्यतिरिक्त मनीषाचे कुटुंब नेपाळच्या राजेशाहीशी संबंधित आहे. मनीषा कोईराला नेपाळचे माजी पंतप्रधान बिश्वेश्वर प्रसाद कोईराला यांची नात आहे. 

मनीषा कोईरालाच्या वडिलांचे नाव प्रकाश कोईराला आणि आईचे नाव सुषमा कोईराला आहे. मनीषाला सिद्धार्थ कोईराला नावाचा एक भाऊ देखील आहे जो बॉलिवूड अभिनेता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com