'द काश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द व्हॅक्सिन वॉर' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटात कोरोनाच्या काळातील संघर्ष आणि लसीच्या संशोधनाची गोष्ट सांगितली आहे.
विवेक अग्निहोत्री यांच्या द कश्मिर फाईल्स चित्रपटामुळे ते प्रचंड चर्चेत होते. आता त्यांच्या 'द व्हॅक्सिन वॉर' या चित्रपटाची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा होत आहे.
विवेक अग्निहोत्री त्याच्या आगामी 'द व्हॅक्सिन वॉर' या चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या चित्रपटाची कथा कोरोनाचा काळ आणि लस यावर बनवण्यात आली आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या खास मुहूर्तावर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. भारतातील पहिला जैव विज्ञान चित्रपट म्हणून या चित्रपटाचे वर्णन करण्यात आले आहे.
चित्रपटाच्या या टीझरमध्ये काहीही न बोलता बरेच काही सांगण्यात आले आहे. हा चित्रपट कोरोनाच्या काळातल्या लसीवर बनवलेली कथा आहे आणि या टीझरची सुरुवात लॅबमध्ये तयार करण्यात आलेल्या लसीपासून होते.
सत्यकथेवर आधारित या चित्रपटाच्या टीझरमध्ये, लसीच्या गुप्त तयारीमध्ये गुंतलेले शास्त्रज्ञ उंदरांवर त्याची चाचणी करताना दिसत आहेत. टीझरमध्ये पल्लवी जोशी एका शास्त्रज्ञाच्या भूमिकेत असून नाना पाटेकरही दिसत आहेत.
विवेक अग्निहोत्रीची पत्नी पल्लवी जोशी, ज्याने 'द काश्मीर फाईल्स'मध्येही महत्त्वाची भूमिका साकारली होती, ती या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसत आहे. या टीझरवर लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एकाने म्हटले आहे की, 'बर्याच दिवसांनी नाना पाटेकर, आपल्या देशाच्या शास्त्रज्ञाला समर्पित दुर्मिळ चित्रपट.' आणखी एका युजरने लिहिले – आता जगाला हे न सांगलेले सत्य कळू द्या, आतुरतेने वाट पाहत आहे. एकजण म्हणाला - जय हो, विजय झाला. तर काही लोकांनी याला प्रोपगंडा फिल्म म्हटले आहे.
एका यूजरने म्हटले आहे की, 'तुझा प्रचार कोण पाहणार? तुम्ही बनवलेला हिंदू-मुस्लिम ऐक्याचा चित्रपट कोणीही पाहू नये, तुम्ही कुठे विष पसरवाल कुणास ठाऊक. असो, सप्टेंबरमध्ये जवान हा चित्रपट गाजणार होता. दुसर्याने लिहिले- बसून ही प्रोपगंडा फिल्म पाहण्यासाठी कोणती लस घ्यावी लागेल?
हा चित्रपट 28 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. 'द व्हॅक्सिन वॉर' हा चित्रपट लसीच्या निर्मितीदरम्यानचे अनेक सत्य समोर आणणार असल्याचे सांगितले जात आहे. विवेक रंजन अग्निहोत्री दिग्दर्शित 'द व्हॅक्सिन वॉर' या चित्रपटात नाना पाटेकर व्यतिरिक्त अनुपम खेर, सप्तमी गौडा आणि पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.