Mahabharat Film साठी 700 कोटी रूपयांचे बजेट; अनेक बडे स्टार झळकणार

अक्षय कुमार अजय देवगण, रणवीर सिंग, परेश रावल, नाना पाटेकर, अनिल कपूर आदी कलाकार झळकणार
Mahabharat Film साठी 700 कोटी रूपयांचे बजेट; अनेक बडे स्टार झळकणार
Published on
Updated on

अॅक्शन, ड्रामा, रोमान्स आणि थ्रिलर या चित्रपटानंतर बॉलिवूड आता पौराणिक (Mythology) कथांकडे वळत आहे. बहूप्रतिक्षित 'महाभारत' (Mahabharat) चित्रपट अखेर निर्मिती प्रक्रियेत आला आहे. अमेरिकेत सुरू असलेल्या D23 एक्स्पोमध्ये त्यावर चित्रपट बनवण्याची घोषणाही करण्यात आली. दिग्दर्शक फिरोज नाडियाडवाला (Firoz Nadiadwala) हा चित्रपट बनवणार आहेत. चित्रपटात अनेक बॉलीवूड कलाकार दिसणार आहेत.

फिरोज नाडियादवाला यांनी हेरा फेरी आणि वेलकम सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फिरोजने या चित्रपटावर काम सुरू केले आहे. गेल्या 4-5 वर्षांपासून या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू असल्याचे बोलले जात आहे. पण, चित्रपटाच्या पूर्वनिर्मितीला आणखी काही दिवस लागतील असे बोलले जात आहे. महाभारत फिल्म साधारण 2025 मध्ये तयार होईल अशी अपेक्षा आहे. चित्रपट हिंदीत बनवला जाणार असला तरी इतर भाषांमध्येही तो डब केला जाणार आहे.

Mahabharat Film साठी 700 कोटी रूपयांचे बजेट; अनेक बडे स्टार झळकणार
Goa Politics: 1 वरून 21! काँग्रेस आमदारांच्या बंडानंतर आरजीने विधानसभेसाठी कंबर कसली

फिरोज नाडियाडवाला (Firoz Nadiadwala) यांनी म्हटल्याप्रमाणे महाभारत चित्रपट हॉलिवूडच्या लॉर्ड ऑफ रिंग्ज, गेम ऑफ थ्रोन्स, स्टार वॉर्स, हॅरी पोर्टर यांना टक्कर देईल. तीन तासांच्या या चित्रपटाचे बजेट जवळपास 700 कोटी रुपये आहे. असे झाल्यास भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा सर्वात मोठा बजेट चित्रपट ठरेल.

आता महाभारत या फिल्मच्या स्टारकास्टबद्दल बोलूयात. या चित्रपटात अक्षय कुमार (Akshay Kumar), अजय देवगण(Ajay Devgan), रणवीर सिंग (Ranveer Singh), परेश रावल (Paresh Raval), नाना पाटेकर (Nana Patekar), अनिल कपूर (Anil Kapoor) आदी कलाकार झळकणार असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये कोणाचे पात्र असेल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या चित्रपटात साऊथचे टॉपचे कलाकारही भूमिका साकारताना दिसणार आहेत.

Mahabharat Film साठी 700 कोटी रूपयांचे बजेट; अनेक बडे स्टार झळकणार
Goa: "ऑपरेशन किचड" गोव्यातील बंडानंतर काँग्रेस नेत्यांची भाजपवर सडकून टिका

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com