गोव्यात बुधवारी मोठी राजकीय उलथापालथ पहायला मिळाली. मागील काही दिवसांपासून भाजप प्रवेशासाठी प्रयत्नशील असलेले आठ काँग्रेस आमदार आज भाजमध्ये दाखल झाले. यामध्ये काँग्रेसचे जेष्ठ नेते दिगंबर कामत (Digambar Kamat), मायकल लोबो (Michael Lobo) यासह संकल्प आमोणकर (Sankalp Amonkar) व इतर नेते असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता केवळ काँग्रेसचे विद्यमान तीन आमदार गोव्यात उरलेले आहेत. काँग्रेसच्या बंडानंतर (Congress Defacation) गोव्यातील इतर पक्षांनी आगामी निवडणूकीसाठी कंबर कसली आहे.
काँग्रेस आमदारांच्या बंडानंतर रिव्हॉल्युशनरी गोवन्स, गोवा फॉरवर्ड तसेच गोवा तृणमूल काँग्रेस यांनी बैठका आणि पत्रकार परिषदांचा धडाका लावला आहे. गोवा फॉरवर्डचे (Goa Forward) आमदार विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी ते मजबूत विरोधकाची भुमिका ठामपणे पार पाडतील अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर, रिव्हॉल्युशनरी गोवन्स (Revolutionary Goans) या पक्षाने तर आगामी विधानसभा निवडणूकीसाठी कंबर कसली असून, पक्षाच्या 21 जागा निवडणून आणण्याचा चंग बांधला आहे.
रिव्हॉल्युशनरी गोवन्सच्या वतीने पक्षाचे अध्यक्ष मनोज परब (Manoj Parab) यांनी काँग्रेस आमदारांच्या बंडखोरीनंतर आपले मत मांडले आहे.
"मनोज परब म्हणाले काँग्रेस आमदार भाजपमध्ये घेऊन जाणे हेच मायकल लोबो यांचे लक्ष्य होते. आरजी पक्ष आता तिसरा सर्वात जास्त मते असलेला पक्ष बनला आहे. काँग्रेसकडे आता आरजीपेक्षा केवळ 5 टक्के अधिक मते आहेत. आमच्या पक्षाला मते खाणारा पक्ष म्हणून राजकीय विश्लेषकांनी हिणवलं. आता नागरिकांकडे फक्त एकच पर्याय शिल्लक आहे, तो म्हणजे रिव्हॉल्युशनरी गोवन्स. आगामी निवडणूकीत एक वरून 21 हे आमचे लक्ष्य आहे." असे वक्तव्य पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी पत्रकार परिषदेत केले.
दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्राईन (Darek O'brien) यांनी देखील गोव्यातील जनतेला तृणमूल काँग्रेसवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे. आम्हाला माहिती होते हे एक दिवस होणारच होते. आम्हाला माहित होते हे बदमाश तुम्हाला निराश करतील. तृणमूल काँग्रेसवर विश्वास ठेवा, आम्ही प्रत्येकवेळी तुमच्यासाठी उपलब्ध असेन." असे ट्विट डेरेक ओ ब्राईन यांनी केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.